उरुळी कांचन (हवेलीनामा ऑनलाईन) येथे बाळासाहेबांच्या शिवसेनेत अलंकार कांचन यांच्यासह मोठ्या मान्यवरांचा प्रवेश कार्यक्रम पार पडला. अलंकार कांचन यांच्याबरोबर एक हजार सत्तर कार्यकर्त्यांचा प्रवेश तसेच 40 मान्यवरांच्या पद नियुक्त्याही करण्यात आल्या. या प्रवेशासाठी प्रमुख नेते माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या हस्ते सर्वांचा प्रवेशाचा कार्यक्रम घेण्यात आला, याप्रसंगी पुणे महानगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक प्रमोद भानगिरे तसेच पुणे जिल्हा अध्यक्ष उल्हास तुपे तसेच माथाडी जिल्हाध्यक्ष निलेश माझीरे, जिल्हा संघटक निलेश काळभोर, उपजिल्हाप्रमुख शामराव माने, उपजिल्हाप्रमुख विजय कामठे, हवेली तालुका प्रमुख विपुल शितोळे, उप तालुकाप्रमुख हरीश कांचन, हवेली तालुका वैद्यकीय कक्षाचे अभिषेक पवार, विभाग प्रमुख सागर फडतरे, शहर प्रमुख हरीश भिवाजी कांचन व इतर पदाधिकारी हे उपस्थित होते

याप्रसंगी नवनिर्वाचित सरपंच तथा उपसरपंच तसेच महात्मा फुले योजना वैद्यकीय क्षेत्रात काम करणारे रणजीत मोरडे यांचाही सत्कार समारंभ पार पडला आढळराव पाटील यांनी उपस्थित शिवसैनिकांना मार्गदर्शन करताना सांगितले की, उरुळी कांचन – डाळिंब रस्ता हा आपण स्वतः जातीने लक्ष घालून चार ते पाच कोटी रुपये निधी या रस्त्याला उपलब्ध करून देण्याचे आश्वासन या प्रसंगी दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *