पुणे (हवेलीनामा आॕनलाईन) महाराष्ट्रात सर्वत्र मोठ्या उत्साहात मंकरसंक्रत सण साजरा केला जातो सुवासिनी एकामेकीना ओवसून सौभाग्याच लेण मागतात हळदीकुंकू लावून शुभेच्छा देतात तसेच लहानाथोरांपासून एकामेकांना तिळगुळ भिरवतात वर्षभर गोड बोला असे म्हणतात.

मकरसंक्रातीच्या दिवशीच औरंगाबाद येथे सासू सुनेने मकरसंक्रातीच्या दिवशी एक अनोखी भेट देऊन मकर संक्रात साजरी केली सासू-सुनेच्या नात्याबद्दल काही वेगळं सांगण्याची गरज नाही. समाजात सहसा या नात्याबद्दल आपण नेहमीच नकारात्मक परिस्थिती पाहतो परंतु सगळ्याच सासा सारख्या नसतात, हे अनेक घटनेतून दिसून येते याला कारण देखील तसच आहे औरंगाबादमध्ये सासू- सुनेच्या नात्याची कौतुकास्पद घटना समोर आली आहे. कारण काही सासू सुनेवर मुलीइतकेच किंबहुना त्याहीपेक्षा जास्त प्रेम करते, हे औरंगाबादच्या लासूर स्टेशन येथील जैस्वाल कुटुंबातील सासूने सिद्ध करून दाखविले आहे. या सासूने आपल्या सुनेला किडनी देऊन तिचे प्राण वाचवले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, लासूर स्टेशन येथील योगिता संजय जैस्वाल या गेल्या वर्षांपासून किडनीच्या आजाराने त्रस्त होत्या. कित्येक पासून त्यांच्यावर डायलेसीस करावे लागत होत. दोन्ही किडन्या निकामी झाल्याने डॉक्टरनी त्यांना किडनी प्रत्यारोपणाचा सल्ला दिला. मात्र त्याच रक्त गटाची किडनी मिळणं एवढे सोपं नव्हते.याबाबत अधिक माहिती अशी की, लासूर स्टेशन येथील योगिता संजय जैस्वाल या गेल्या वर्षांपासून किडनीच्या आजाराने त्रस्त होत्या. कित्येक महिन्यांपासून त्यांच्यावर डायलेसीस करावे लागत होते. दोन्ही किडन्या निकामी झाल्याने डॉक्टरनी त्यांना किडनी प्रत्यारोपणाचा सल्ला दिला. मात्र त्याच रक्त गटाची किडनी मिळणं एवढे सोपं नव्हते. इतर नातेवाइक तसेच इतरांची किडनी त्यांना जुळत नव्हती. यामुळे जैस्वाल कुटुंबांसमोर मोठे संकट उभे राहिले. याबाबत कुटुंबात चर्चा होत असतांनाच क्षणाचाही विचार न करता 64 वर्ष वयाच्या योगिता यांच्या सासू रत्नाबाई रमेश जैस्वाल यांनी किडनी देण्याची इच्छा व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *