पुणे (हवेलीनामा आॕनलाईन) राज्यासह पुण्यातील काॕलेज तरुणांना महिलाचा फोटो डिपी ठेऊन सेक्सटोर्सन मध्ये अडकवू पाहणाऱ्या ठकास राजस्थान मधून अटक करण्यात पुणे पोलिसांना यश मिळाले.

महिलेचा व्हॉट्सअँपवर डीपी ठेवून मुलाबरोबर चॅटिंग व व्हिडिओ कॉलिंग करुन मोठ्या चलाकीने त्याचा न्यूड व्हिडीओ तयार करुन सोशल मीडियावर अपलोड करण्याची धमकी देऊन तरुणाला लुबाडणाऱ्याचा प्रकार घडला होता यागोष्टीचा शिकार होऊन सहकारनगरमधील तरुणाने बदनामीच्या भीतीने आत्महत्या केली होती.या प्रकरणामुळे शहरात एकच खळबळ उडाली होती यामुळे पोलिस यंत्रणा देखील सतर्क होऊन तपासाची चक्रे फिरावली सहकारनगर पोलिसांनी तब्बल 7-8 दिवस राजस्थानमध्ये रेकी करून आरोपीला पकडले.

शहाबाज खान (रा. रायपूर, सुकेती, ता. सिकरी, जि. भरतपूर, राजस्थान) असे आरोपीचे नाव आहे. सेक्सटॉर्शनमधून सहकारनगर व दत्तवाडी येथे गेल्या वर्षी दोघा तरुणांनी आत्महत्या केली होती. त्यातील एका घटनेत दत्तवाडी पोलिसांनी अन्वर सुबान खान (वय २९, रा. गुरुगोठडी, ता. लक्ष्मणगढ, जि. अलवर) याला अटक केली होती.

दुसऱ्या घटनेचा तपास चालू असताना सहकारनगर पोलिसांनी आरोपीच्या राहत्या घराची माहिती मिळवली. पोलिस उपनिरीक्षक हसन मुलाणी, पोलिस अंमलदार संजय गायकवाड, सागर सुतकर, निखिल राजीवडे व सागर कुंभार हे रायपूरला गेले. त्यांनी स्थानिक पोलिसांच्या मदतीने तब्बल ८ दिवस रेकी करून शहाबाज खान याला पकडून पुण्यात आणले. वरिष्ठ पोलिस निरीक्षक सावळाराम साळगावकर तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *