पुणे (हवेलीनामा आॕनलाईन) जी 20 गटामध्ये विकसित आणि विकसनशील देश असून या देशातील शहरीकरण आणि शहरीकरणातील आव्हान या मुद्द्यांवर या परिषदेत चर्चा होणार असल्याची माहिती या बैठकीच्या पूर्वसंध्येला अर्थ मंत्रालयाचे सहसचिव सॉलोमन आरोग्यराज यांनी काल पुण्यात पत्रकार परिषदेत घेतले

भविष्यातील शाश्वत आणि सर्वसमावेशक शहरांच्या उभारणीसाठी निधी कसा उभारता येईल यावरही या परिषदेत चर्चा करण्यात येणार असल्याचं सॉलोमन यांनी सांगितला दोन दिवस चालणाऱ्या या परिषदेमध्ये जी 20 गटातील प्रतिनिधी देशांबरोबरच इतरही निमंत्रित देशातील प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत जागतिक बँक आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि आशियाई बँकेच्या प्रतिनिधींचाही यामध्ये सहभाग असणार आहे या परिषदेचे उद्घाटन आज सकाळी केंद्रीय सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांच्या हस्ते होणार आहेत त्यानंतर दुपारी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात जगभरातून आलेल्या पाहुण्यांसाठी सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आला आहे या बैठकीसाठी विविध देशांच्या 38 प्रतिनिधींचा काल लोहगाव विमानतळावर ढोल ताशाच्या गजरात आणि तुतारीच्या निनादात पारंपारिक पद्धतीने स्वागत करण्यात आले

जी 20 परिषदेत पायाभूत सुविधा कार्यगट मालमत्ता श्रेणी म्हणून विकसित होणाऱ्या दर्जेदार पायाभूत सुविधांसह यातील गुंतवणुकीचे विविध पैलू आणि आर्थिक साधन स्रोत जमा करण्याकरता नवनव्या साधनांची निवड करणे या विषयावर विचार मंथन करत असतो पायाभूत सुविधा कार्याची फलनिष्पत्ती जी वीस वित्तीय प्राधान्यक्रमांमध्ये वापरली जाते आणि त्याद्वारे पायाभूत सुविधांच्या विकासाला प्रोत्साहन दिले जातात भारताच्या जी 20 अध्यक्षतेची एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य ही संकल्पना 2023 च्या पायाभूत सुविधा जाहीरनाम्यासाठी पोषक वातावरण निर्माण करणारे आहे पुण्यातील बैठकीत हा जाहीरनामा तयार करण्यावर भर दिला जाणार आहे भविष्यातील शहरांना समावेशक आणि निरंतर अर्थ साहाय्यक या विषयावर दोन दिवसांच्या बैठकांमध्ये प्रामुख्याने चर्चा होणे अपेक्षित आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *