पुणे (हवेलीनामा आॕनलाईन) हवेली तालुक्यासाठी हडपसर येथील जॅकवेल मधून मुळा मुठा नदीतील उपसा केलेले पाणी बेबी कॅनॉलच्या माध्यमातून उपलब्ध करून दिले यात दरम्यानच्या काळात या कॅनलचे काम करत असताना शेवाळवाडी परिसरामध्ये क्या कॅनॉल दरम्यान ड्रेनेज वाहून नेणारी लाईन फुटली त्यात दुरुस्ती करून एक चेंबर बसवण्यात आला होता परंतु हे काम कच्चेच असताना पाटबंधारे खात्याकडून या कॅनॉल मधून पाणी सोडण्यात आले. पाण्याचा दाब जास्त असल्याने हा हा चेंबर फुटून प्रचंड प्रमाणात घाणीचे पाणी पुणे सोलापूर महामार्गावरील मांजरी उपबाजार समितीमध्ये घुसले आणि यामुळे शेतकऱ्यांचे मोठे हाल झाले सर्व परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले आहे
या संदर्भात मांजरी उपबाजार समितीचे अधिकारी घुले यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की या कॅनॉलचे काम करत असताना जी गटर लाईन फुटली आहे ती त्वरित दुरुस्त करून त्यानंतरच पाणी सोडावे अशा प्रकारे भ्रमणध्वनीवर हडपसर क्षेत्रीय कार्यालयास तसेच पाटबंधारे खात्यास माहिती दिली होती. परंतु याकडे केवळ दुर्लक्ष करून शेतकऱ्यांसाठी या कॅनॉलमधून पाणीपुरवठा करण्यासाठी पाणी सोडण्यात आले पाण्याच्या मोठ्या प्रमाणावर दाबाने नुकतेच तयार केलेले चेंबर फुटून मोठ्या प्रमाणावर हे पाणी बाजार समिती परिसरात घुसले यामुळे सर्वत्र घाण युक्त पाणी पसरलेले आहे.
