पुणे (हवेलीनामा आॕनलाईन) शिरूर तालुक्यात कटावणी चाकू व कोयत्यांचा वापर करून दरोडे घालणारी टोळी हैदोस माजवत होती यास प्रतिबंध करण्यासाठी शिरूर पोलिसांपुढे मोठे आव्हान निर्माण झाले होते हे दरोडेखर एकच बोलीभाषा व कपडे वापरत असल्याने त्यांचा शोध घेणे जिगीरीचे होते अनेक ठिकाणी चोरीची वेळ देखील सारखीच असल्याचे दिसून आले गुन्हा केल्यानंतर तेथील कोंबडया चोरून नेत होते व काही ठिकाणी विष्ठा करीत होते हे घटनास्थळावरून दिसून आलेले होते.
गुन्हे हे गंभीर स्वरूपाचे असल्याने गुन्हे उघडकीस आणण्यासाठी पोलीस अधिक्षक अंकीत गोयल, अप्पर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे,उप विभागीय पोलीस अधिकारी यशवंत गवारी यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस. निरीक्षक. अविनाश शिळीमकर, शिक्रापूर पोलीस.स्टेशन चे पोलीस. निरीक्षक हेमंत शेडगे, रांजणगाव पोलीस.स्टेशनचे पोलिस. निरीक्षक. बलवंत मांडगे यांचे नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेतील सहाय्यक.पोलीस.निरीक्षक. सचिन काळे, पोलीस उपनिरीक्षक गणेश जगदाळे, शिवाजी ननावरे, सहा. फौज. तुषार पंदारे, मुकुंद कदम, पोलीस.हवालदार. जनार्दन शेळके, राजु मोमीन, मंगेश थिगळे, योगेश नागरगोजे, दिपक साबळे, सचिन घाडगे, विजय कांचन, आसिफ शेख, अजित भुजबळ, पोलीस शिपाई धिरज जाधव, अक्षय नवले, अमोल शेडगे, अक्षय सुपे, शिक्रापूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक.पोलीस.निरीक्षक.नितीन अतकरे, पोलीस. हवालदार. अमोल दांडगे, श्रीमंत होनमाने, पोलीस. शिपाई. निखील रावडे, किरण निकम, अपेक्षा तावरे, रांजणगाव पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक विनोद शिंदे, सहाय्यक फौजदार. दत्ता शिंदे, पो.हवालदार. विलास आंबेकर, पोलीस शिपाई. विजय शिंदे, उमेश कुतवळ, म.पो.कॉ. मोनिका वाघमारे यांची वेगवेगळी पथके तयार करून तपास करण्यास रवाना केली. तसेच श्रीगोंदा उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयातील पोहवा ढवळे यांना मदतीस घेतले होते.
या गुन्हयांचा तपास करीत असताना पथकास निदर्शनास आले की, गुन्हेगार हे एकाच गुन्हे पध्दतीचा अवलंब करून गुन्हे करीत आहे त्यामुळे पथकाने अशाप्रकारचे गुन्हे करणारे गुन्हेगारांचे गोपनीय बातमीदाराकडून बातमी काढली असता बातमी मिळाली की, वाडेगव्हाण, जि. अहमदनगर आणि कोळेगाव, जि. अहमदनगर येथे राहणारे इसमांनी हे गुन्हे केलेले आहेत अशी माहिती प्राप्त झाली होती त्यावरून आदेश लालकुश काळे, वय २२ वर्षे व सचिन संतोष काळे, वय २३ वर्षे, दोन्ही रा. मोहोरवडी, कोळगाव, ता. श्रीगोदा, जि. अहमदनगर यांना ताब्यात घेऊन त्यांचेकडे तपास केला असता त्यांनी त्यांच्या फरार साथिदारांसह रांजणगाव पोलीस स्टेशनचे हद्दीत बुरुंजवाडी व सोनेसांगवी , शिक्रापूर पोलीस स्टेशनचे हद्दीत पिंपळे धुमाळ व मुखईत घडलेले एकुण (०४) दरोडा गुन्हे हे केले केल्याचे निष्पन्न झाले. तपासादरम्यान त्यांचेकडून गुन्हयात चोरीस गेलेला मोबाईल फोन, गुन्हा करताना वापरलेला लोखंडी कोयता, चाकु, एक लोखंडी कटावणी, १ तोळा वजनाचे सोन्याचे शॉर्ट गंठण अशा वस्तु जप्त करण्यात आल्या आहेत.
