काठमांडू (हवेलीनामा ऑनलाईन) नेपाळमधील पोखरा आंतरराष्ट्रीय विमानतळावर 72 आसनी प्रवासी विमान धावपट्टीवर कोसळल्याची माहिती मिळाली असून बचावकार्य सुरू आहे, सध्या विमानतळ बंद आहे.
अपघाताबाबत माहिती देताना यति एअरलाइन्सचे प्रवक्ते सुदर्शन बर्तौला यांनी सांगितले की, काठमांडू विमानतळ आणि पोखरा आंतरराष्ट्रीय विमानतळादरम्यान कोसळलेल्या विमानात एकूण ६८ प्रवासी आणि चार क्रू मेंबर्स होते. यती ही खुप जुनी विमानसेवा कंपनी असून देशांतर्गत सेवा पुरवते. या अपघातात 30 ते 32 प्रवासी दगावल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे सर्वत्र धुराचे लोटस पहावयास येत होते बचावाचे कार्य चालू असून आणखी आगीवर नियंत्रण नाही मृताचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे
