पुणे (हवेलीनामा आॕनलाईन) आपला देश तरुणाईचा देश म्हणून जागतिक पातळीवर प्रसिद्ध आहे देशांतर्गत युवकांनी राजकारणासह उद्योगधंदात पुढे येण्यासाठी त्यांना जास्तीतजास्त संधी बहाल करणे काळाची गरज आहे परंतु सद्य परिस्थितीतील राजकीय नेत्यांकडन अशी संधी उपलब्ध करून दिली जात नाही, सध्या महाराष्ट्रातील सरासरी ६० टक्के लोकसंख्या ही ४० वर्षाखालील तरुणाईची असली तरीही सार्वजनिक धोरण – निर्धारण यंत्रणेत या युवकांचा सहभाग अत्यल्प असून राजकीय क्षेत्रात विधिमंडळ आणि संसदेतही ४० वर्षांखालील लोकप्रतिनिधींचे प्रतिनिधीत्वही अत्यल्प आहे. त् त्यामुळे प्रशासन आणि धोरणनिर्मिती प्रक्रियेत याच तरुणांनी अधिकाधिक योगदान देऊन महाराष्ट्राला पुन्हा गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी महाराष्ट्र व्हिजन फोरम’ ची स्थापना करण्यात आली आहे, अशी माहिती आमदार रोहित पवार यांनी पुणे येथे पुणे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
महाराष्ट्र हे देशातील प्रगतीशील राज्यांपैकी एक आहे.मात्र, ऑल इंडिया इंडेक्स – २०२० मध्ये ९ व्या तर, सामाजिक प्रगती निर्देशांकात २९ वे स्थान अशा विविध निर्देशांकामधून महाराष्ट्र बाहेर पडला आहे. महाराष्ट्रातील सुमारे ६० टक्के लोकसंख्या ही ४० वर्षाखालील युवकांची आहे.परंतु सार्वजनिक धोरण आणि नियंत्रण या युवकांचा सहभाग अत्यल्प आहे. तर दुसरीकडे संसद आणि विधिमंडळांमध्ये प्रतिनिधीत्व कमीच आहे. शासन आणि धोरणनिर्मितीच्या प्रक्रियेत तरुण वर्ग आपले योगदान देऊ शकेल, असे कोणतेही व्यासपीठ महाराष्ट्रात उपलब्ध नाही, त्यामुळे ही उणीव भरून काढण्याचे काम महाराष्ट्र व्हिजन फोरम करणार असल्याचे आमदार रोहित पवार यांनी सांगितले.
महाराष्ट्र राज्याचा ७५ वा वर्धापन दिन सन २०३५ आहे. या वर्धापन दिनापर्यंत सर्वसमावेशक शाश्वत विकास साधण्यासाठी राज्यातील तरुणांच्या सहभागातून अजेंडा तयार करण्याचा महाराष्ट्र व्हिजन फोरमचा प्रयत्न आहे. महाराष्ट्राला पहिल्या क्रमांकाचे राज्य बनविण्यासाठी युवांच्या सृजनशील विचारांचा उपयोग करणे हे या फोरमचे उद्दिष्ट असून आरोग्य, शिक्षण, कृषी, क्रीडा, प्रादेशिक असमतोल, भूक, पिण्याचे पाणी, ऊर्जा, उद्योग, अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीचे कल्याण, गरीबी, स्वच्छता, वातावरणीय बदल, संस्कृती – पर्यटन, वायू प्रदुषण, लैंगिक समानता, गृहनिर्माण, रोजगार, कायदा-सुव्यवस्था अशा १९ विषयांवर राज्यातील युवकांना नागरिकांना मतदान करता येईल. याविषयांव्यतिरिक्त कुणाला वेगळ्या विषयासंदर्भात काही सुचवायचे असेल तर तसा पर्यायही देण्यात आला आहे.
