पुणे (हवेलीनामा आॕनलाईन) महाराष्ट्र केसरी विजेत्या राज्य शासनाकडून नोकरी संधी तर दरमहा पंधरा हजार रुपये मानधन देणार असे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केली

पुण्यातील मामासाहेब मोहोळ क्रीडा नगरी आज महाराष्ट्र केसरी किताबासाठी लढत झाली यात शिवराज राक्षे व महेंद्र गायकवाड यांच्यात 65 वी अंतिम लढत झाली यामध्ये शिवराज राक्षे यांनी महाराष्ट्र केसरी हा किताब पटकावला त्यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विजेत्यांना बक्षीस वितरण करताना मोठ्या घोषणा केल्या. महाराष्ट्र केसरी व हिंदकेसरी विजेत्याला पंधरा हजार रुपये मानधन तर ऑलिंपिक स्पर्धेत विजेत्यास वीस हजार रुपये मानधन देण्याची घोषणा फडणवीस यांनी केले यापूर्वी जागतिक स्तरावरील कुस्तीपटूस केवळ 6000 रुपये मानधन देण्यात होते आता यात भरपूर वाढ करून 20 हजार रुपये देण्यात येतील तर महाराष्ट्र केसरी विजेत्यास केवळ चार हजार रुपये मानधन देण्यात येत होते यात वाढ करुन 15000 रुपये करण्यात येईल तसेच वयोवृद्ध खेळाडूंना साडेसात हजार रुपये मानधन देण्याची घोषणा यावेळी केली.

राजगुरुनगर येथील राक्षेवाडी चा तसेच वस्ताद काका पवारांकडे कुस्तीचे धडे घेतलेला मल्ल शिवराज राक्षे यांनी यावर्षीचा हा किताब पटकावला सध्या तो नांदेडचे प्रतिनिधित्व करतो तसेच त्यांनी आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केलेले आहे.त्याचे आजोबा तसेच वडील हे देखील कुस्तीगीर होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *