पुणे (हवेलीनामा आॕनलाईन) बहुचर्चित वेड सिनेमाने सलग तिसऱ्या आठवड्यात देखील बाॕक्स आॕफिसवर बकळ गल्ला जमवला आहे रितेश देशमुख आणि जिनिलिया देशमुखच्या ‘वेड’ या सिनेमाने आता तिसऱ्या आठवड्यात प्रवेश केला आहे.अभिनेता रितेश आणि जिनिलिया देशमुखचा’वेड’ हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर आधिराज्य गाजवले आहे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेला वेड सिनेमानी प्रेक्षकांनी भुरळ पडली आहे पहिल्या आणि दुसऱ्या आठवड्यात मिळालेल्या घवघवीत यशानंतर या सिनेमाने आता तिसऱ्या आठवड्यात प्रवेश केला आहे. या सिनेमाने प्रदर्शित झाल्यानंतर पहिल्याच आठवड्यात २०.६७ कोटी आणि दुसऱ्या आठवड्यात २०.१८ कोटींची कमाई केली आहे. आतापर्यंत या सिनेमाने ४०.८५ कोटींचा टप्पा गाठला असल्याने सुपरहिट ठरला आहे रितेश देशमुखने ‘वेड’ या सिनेमाचं पोस्टर शेअर करत चाहत्यांचे आभार मानले आहेत.शेअर केलेल्या फोटोवर रितेश आणि जिनिलियाचा फोटो दिसत असून या पोस्टरवर ‘ब्लॉकबस्टर’ असे लिहिण्यात आले आहे. तुमचे अपार प्रेम आणि कौतुकाबद्दल आभार”. रितेशच्या पोस्टवर ‘मराठीतले सुपरस्टार, भाऊ तुम्ही मराठीतच सिनेमा बनवत जा, ‘वेड’ हिंदीत कधी येणार? अशा कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत. ‘वेड’ या सिनेमाची बॉक्स ऑफिसवरील घौडदौड पाहता हा सिनेमा नागराज मंजुळेच्या ‘सैराट’ या सिनेमाचा १००कोटीचा रेकॉर्ड मोडणार अशी शक्यता वर्तवली जात आहे. पुण्यात तर सर्व शो हाऊसफुल्ल सुरु आहेत महाराष्ट्रात सैराट नंतर रितेशच्या वेडने मात्र प्रेक्षकांना वेड लावल एवढं मात्र नक्की

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *