पुणे (हवेलीनामा आॕनलाईन) वाघोलीतील पी एम पी एल डेपोची दयनीय आवस्था झाली असून प्रवाशीच्या सोईसुविधांकडे सोयिस्कर दुर्लक्ष होत असल्याची परिस्थिती आहे याबाबत प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी असून नेमक्या सुविधा देण्यासाठी यावर्षात तरी मूहुर्त लागणार का अशी चर्चा प्रवासांमध्ये आहे बस डेपो मध्ये प्रवाशांसाठी सुविधांची उणीव असतानाच महिला प्रवाशांसाठी असुरक्षितही झाले आहे. या परिसरात दारूचा अड्डाही चालत असल्याची चर्चा आहे असून बस डेपोला खाजगी वाहतूकदारांचा विळखा पडला आहे यामुळे प्रवाशांना जीवमुठीत धरुन रस्त्याने प्रवास करावा लागतो आहे, डेपोच्या आजूबाजूला टाकलेला कचऱ्यामुळे सर्वत्र घाण पसरली असल्याने दुर्गंधीचे साम्राज्य आहे.याकडे प्रशासन जाणूनबुजून दुर्लक्ष करत आहे की काय असा प्रश्न नागरीकांना पडला आहे एवढी भयावह परिस्थिती असतानाही महापालिका व पी एम पी एल प्रशासन मात्र झोपेचे सोंग घेत आहे. काही वर्षांपूर्वी महापालिकेने पी एम पी एल बस डेपोसाठी ही जागा घेतली. येथे सुसज्ज डेपो उभारण्याची घोषणाही केली मात्र त्या सगळ्या हवेतच विरल्या साध्या सुविधाही महापालिका व पी एम पी एल ला देता आल्या नाही. यामुळे कर्मचारी व प्रवासी यांचे हाल होतात. तेथील जागेचे डांबरीकरण अथवा काँक्रीटीकरण ही करता आले नाही. त्यामुळे धुळीचा त्रास सर्वांना सहन करावा लागत आहे. प्रवाशांसाठी स्वछतागृह नाही. बस आल्यानंतर बस मागे प्रवाशांना धावावे लागते. त्यात मोठमोठे खड्डे असल्यामुळे तसेच लहानमोठे दगडीगोट्यामुळे अनेकदा प्रवाशाना ठेच लागून दुखापत होते गाडीत जागा पकडण्यासाठीची धावपळ पीएमपीएलच्या गलथान कारभारामुळे नाहक एखाद्याच्या जीवावर बेतण्याची शक्यता नाकरता येत नाही विजेची पुरेशी व्यवस्था नाही. कोणते माहिती फलक नाही. केवळ उत्पन्न मिळविण्याचे काम पी एम पी एल करीत आहे.
