पुणे (हवेलीनामा आॕनलाईन)   महाबळेश्वर(जि.सातारा) मजुरांना घेऊन निघालेल्या 407 टेम्पोला भीषण अपघात झाला  असून  टेम्पोमध्ये लहान मुलांसह महिलासह पुरुष असे जवळपास ३५ ते ४०जण असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे या अपघातात जखमी झालेल्या नागरिकांवर महाबळेश्वरच्या सरकारी रुग्णालयात उपचार सुरु असून हे मजूर बुलढाणा आणि अकोला जिल्ह्यातील असल्याची महिती समोर येत आहे महाबळेश्वर तालुक्यातील मुकदेव गावानजीक तीव्र उतारावर बुलढाणा व अकोला भागातून कामासाठी मजुर घेऊन जाणाऱ्या टेम्पोला सकाळी अपघात झाला. या झालेल्या अपघातातील जखमींमध्ये लहान मुलांचा समावेश आहे

अपघातातील काही जखमींना तळदेव येथे तर काहींना महाबळेश्वर ग्रामीण रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले असून दोन गंभीर जखमी लहान मुलांना सातारा येथील सरकारी रुग्णालयात पाठविण्यात आलं आहे.घटनेची महिती मिळताच पोलिस प्रशासन व सह्याद्री ट्रेकर्सच्या जवानानी अपघातातील जखमीना बाहेर काढण्यासाठी मदत करुन जखमीना रुग्णालयात दाखल केले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *