पुणे (हवेलीनामा आॕनलाईन)   बीड जिल्ह्यात शेतकरी महिलाचा अपघाती मृत्यू मुळे एकच खळबळ उडाली असून या घटनेने खामगावावर शोककळा पसरली आहे याबाबत सविस्तर माहिती पुढील प्रमाणे गेवराई (ता.बीड) तालुक्यातील खामगाव येथील शेतात तुरीचे खळे सुरु असताना एका ३८ वर्षीय शेतकरी महिलेचा मळणी यंत्रात अडकून मृत्यू झाल्याची घटना बुधवारी सायंकाळी ६.३० वाजेच्या सुमारास घडली होती. संगीता शिवाजी पवार असे मृत महिलेचे नाव आहे. निष्काळजीपणे मळणीयंत्र चालवल्याने याप्रकरणी चालकावर गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहागड ( ता. अंबड जि. जालना) येथील पवार कुटुंबाचे गेवराई तालुक्यातील खामगाव येथे शेत आहे. बुधवारी शेतात तुरीचे खळे करण्यासाठी शिवाजी पवार, पत्नी संगीता आणि दोन मुलांसह शेतात आले होते. मळणी यंत्र सुरु असताना धक्का लागल्याने संगीता मळणी यंत्राच्या पंख्याला अडकल्या. काही क्षणातच संगीता यांच्या शरीराचे तुकडे होऊन जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी अजय शिवाजी पवार ( वय२० ) याच्या फिर्यादीवरून मळणी यंत्र चालक संदिप भारत उधे ( रा. खामगाव) याच्यावर गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *