पुणे (हवेलीनामा ऑनलाईन) शारीरिक मेहनत करणाऱ्या प्रत्येक मल्लाची अपेक्षा असते की आपण महाराष्ट्र केसरी हा किताब मिळवावा दरवर्षी याचे आयोजन केले जाते आणि यातून राज्यातील 40 मल्लांना सहभागी करण्यात येते. माती व मॅट या दोन प्रकारांमध्ये ही स्पर्धा खेळवली जाते यातून जो मल्ल आपल्या कौशल्याच्या जोरावर विजेता होतो त्यास मानाची चांदीची गदा दिली जाते. महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांनी पुणे येथील महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी हजेरी लावली यावेळी त्यांनी महाराष्ट्र केसरी विजयी होणाऱ्या विजेत्यास राज्य शासनाकडून शासकीय नोकरी मिळावी ही अपेक्षा व्यक्त केली प्रत्येक विजेत्यास नोकरी मिळतेच असे नाही त्यामुळे राज्य शासनाने यावर सकारात्मक विचार करून जर महाराष्ट्र केसरी विजेत्या राज्य शासनाची नोकरी मिळाली तर भविष्यात मल्लविद्याकडे तरुणांचे आणखी ओढ वाढेल अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.

महाराष्ट्र केसरी विजय चौधरी पुढे म्हणाले की महाराष्ट्र केसरी या नावातच एक वेगळेपण असून यावर्षी याला एक वेगळेच वजन प्राप्त झालेले आहे कारण विजेत्यास यावेळी महिंद्र थार ही गाडी आणि पाच लाख रुपयाचे रोख बक्षीस देण्यात येणार आहे त्यामुळे ही स्पर्धा अतिशय चुरशीचीच होणार यात शंका नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *