नाशिक (हवेलीनामा ऑनला ईन) सिन्नर तालुक्यातील वावी-पाथरे गावांच्या दरम्यान सिन्नर-शिर्डी राज्य मार्गावरील ज्ञानेश्वर मंदिराजवळ पहाटेच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात 10 जणांचा मृत्यू झाला आहे. खासगी आराम बस आणि मालमोटार समोरासमोर धडकल्याने मोठा अपघातात झाला . यात खासगी बस आणि ट्रकचा चुराडा झाला आहे. अपघातात अनेकजण जागेवरच मृत्यू झाला. तर काहींचा रुग्णालयात मृत्यू झाला. या अपघातात 15 ते 20 जण जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
आज पहाटे सिन्नर तालुक्यातील वावी-पाथरे दरम्यान सिन्नर-शिर्डी राज्या मार्गावर हा भयंकर अपघात झाला. या अपघातात 10 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये दोन पुरुष, 6 महिला तर दोन लहानग्यांचा समावेश असल्याची पोलिसांनी माहिती दिली. या अपघातानंतर एकच आक्रोश आणि किंकाळ्या सुरू झाल्या. प्रवाश्यांच्या ओरडण्याचा आणि रडण्याचा आवाज ऐकून ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन त्यांना तातडीने मदत केली.
खासगी बसमधून 35 ते 45 प्रवासी प्रवास करत होते. त्यापैकी 15 ते 20 जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघातातील गंभीर जखमींवर सिन्नर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर काहींवर शिर्डी येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या अपघाताप्रकरणी वावी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी पंचनामा केला असून अधिक तपास सुरू आहे.
नाशिक-शिर्डी महामार्गावर वावी पाथरे गावाजवळ झालेल्या खासगी बसच्या अपघातावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. अपघातातील मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाख रुपये देण्याचे आणि जखमींवर शासकीय खर्चाने आवश्यक ते उपचार करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला दिले आहेत.
