थेऊर (हवेलीनामा ऑनलाईन) यावर्षातील पहिली चतुर्थी अंगारक योगावर आली असल्याने भाविकांनी कडाक्याच्या थंडीत देखील पहाटेपासून श्री चिंतामणी गणपतीच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती.यात हजारो भाविकांनी दर्शन घेतले.

मंदिराचे व्यवस्थापक डाॅ.मंगलमूर्ती पोफळे यांनी दिलेल्या माहितीनुसार,अंगारक योगावर येणाऱ्या चतुर्थीस हजारो भक्त श्री चिंतामणी दर्शनासाठी रांगा लावतात.यासाठी भाविकांना सुलभ दर्शन व्हावे यासाठी देवस्थान कडून सर्व व्यवस्था केली जाते.देऊळ वाड्यात दर्शनबारीची सोय करण्यात येते.पहाटे पाच वाजता आगलावे बंधूच्या वतीने मकरंद आगलावे यांनी महापुजा केल्यानंतर मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात आले.

चिंचवड देवस्थान ट्रस्टच्या वतीने मोरेश्वर पेंडसे यांनी महापुजा केली दिवसभर भक्तांनी मोठ्या रांगा लावल्या.गावातील महिला बचतगटातील उत्पादित मालाला बाजारपेठ उपलब्ध व्हावी यासाठी पै.दत्तात्रय उर्फ आबा काळे सामाजिक प्रतिष्ठानच्या माध्यमातून चिंतामणी महोत्सव आयोजित करण्यात येतो यात अनेक महिलां आपले उत्पादन विक्री करिता ठेवतात.

सायंकाळी हभप शिवाजी महाराज आळंदीकर यांचे हरिकीर्तन झाले चंद्रोदयानंतर ग्रामस्थांच्या वतीने भाविकांना महाप्रसाद वाटप करण्यात आला.दिवसभर कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही यासाठी थेऊर पोलीस चौकीचे पोलीस उपनिरीक्षक विष्णू देशमुख व त्यांचे सहकारी पोलीस हवालदार विजय जाधव, विशाल बनकर आदी पोलिसांनी चोख नियोजन केले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *