लोणी काळभोर (हवेलीनामा ऑनलाईन)

लोणी काळभोर येथील टायनी हार्ट्स प्री स्कूलची सुरुवात वर्षापूर्वीच झाली आणि त्याला परिसरातील पालकांनी भरभरून प्रतिसाद दिला. विद्यार्थी पालक यांच्या प्रचंड उत्साह प्रेम आणि सहकार्याने पहिला स्नेहसंमेलन आणि बक्षीस वितरण कार्यक्रम उत्साहात पार पडला यावेळी शाळेतील छोट्या बालचमुंनी मनसोक्त नाचत बागडत आपले स्वतःचे सेल्फ इंट्रोडक्शन श्लोक प्रार्थना सर्वांपुढे म्हणून दाखवली त्याचबरोबर क्लासच्या मुलांनी वेगवेगळ्या गाण्यांवर आपली नृत्यकला सादर केली. शिवाय मुलांनी अनेक छोट्या मोठ्या कामात मदत केली त्याचबरोबर मदर बेबी थीम साठी मुलांच्या पालकांनी म्हणजेच आईं नी खूप छान नृत्य सादर केले त्याचबरोबर ऐतिहासिक प्रसिद्ध महिला राजमाता जिजाऊ, राणी लक्ष्मीबाई साहेब ,सावित्रीबाई फुले ,महाराणी ताराराणी आनंदीबाई जोशी, अशा विविध इतिहासात सुवर्ण अक्षरात ज्यांची नावे कोरली गेली आहेत. त्यांची वेशभूषा करून शिवाय येणाऱ्या पिढीने देखील तशी वेशभूषा करून रॅम्प वॉक केला. अशाप्रकारे विविध रंग ढंगात सोहळ्याच्या थीमनुसार रंगतरंग आमच्या छोट्या छोट्या बालचमूनी अनेक रंग भरत हा उत्सव रंगवून टाकला. यावेळी, कार्यक्रमाच्या उद्घाटनाचे अध्यक्ष स्थान लोणी गावच्या सरपंच माधुरी काळभोर यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन झाले आणि माधुरी काळभोर यांनी पालक आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तर बक्षीस वितरण कार्यक्रम कदमवाकवस्तीच्या माजी सरपंच गौरी गायकवाड यांच्या हस्ते पार पडले तसेच अभिनेत्री अनुश्री धम यावेळी उपस्थिती होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मिलिंद पवार यांनी केले. त्याचबरोबर बक्षीस वितरणाचे सर्व सूत्र भाग्यश्री यांनी केले आणि पालकांसाठी चांगले पालकत्व कसे असावे यावर मार्गदर्शन केले. त्याचबरोबर शाळेच्या प्रिन्सिपल तृप्ती पिसाळ यांनी आपल्या सुंदर आवाजात पाहुण्यांसाठी स्वागत गीत गायले.शाळेचे उद्दिष्टे आणि आपण नक्की कोणत्या गोष्टींवर ते काम करणार आहे याची सर्व माहिती प्रियांका ढम यांनी दिली. जयश्री लोहार, मारुती लोहार, मिलिंद लोहार, हेमलता ढम, शुभांगी फलटण, प्रिती भोसले, सुषमा आदी उपस्थित होत्या. आभार प्रदर्शन अनुप राजेंद्र ढम यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *