लोणीकाळभोर (हवेलीनामा ऑनलाईन) महाराष्ट्र राज्य मराठी पञकार संघाच्या हवेली तालुका यांच्यावतीने पत्रकार दिनाचे औचित्य साधून मराठीतील आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या तैरचित्रास पुष्पहार अर्पण करण्यात आला व अभिवादन करण्यात आले यावेळी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष सिताराम लांडगे यांनी प्रतिमेस पूजन केले. याच कार्यक्रमात हवेली तालुका मराठी पत्रकार संघाचा विस्तार करण्यात आला यात सोशल मिडिया अध्यक्षपदी सोरतापवाडी येथील दैनिक बाळकडूचे प्रतिनिधी पञकार दिपक गिरी यांची तर हवेली तालुका प्रसिध्दी प्रमुखपदी कदमवाकवस्तीचे साप्ताहिक जगताराचे पञकार राम भंडारी यांची निवड करण्यात आल्याचे निवड समितीचे अध्यक्ष शरद पुजारी यांनी जाहिर केले ही निवड पञकार संघाचे जिल्हा अध्यक्ष सिताराम लांडगे यांच्या सुचनेनुसार झाली यावेळी पञकार संघाच्या जिल्हा अध्यक्ष यांच्या हस्ते त्यांना निवडीचे पञ देण्यात आले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या यावेळी हवेली तालुका अध्यक्ष पंढरीनाथ नामगुडे,उपाध्यक्ष गणेश धुमाळ,कार्याध्यक्ष तुषार काळभोर,सचिव दिगंबर जोगदंड,सहसचिव विजय रणदिवे, अमन शेख,पप्पू शेंडगे, प्रहार संघटनेचे जिल्हा अध्यक्ष शिवराज काळभोर,तसेच संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.
