पुणे (हवेलीनामा ऑनलाईन) जुन्या भांडणाचा बदला घेण्यासाठी मित्राचा खून करून पळून आलेल्या तीन इसमांना लोणी काळभोर पोलिसांनी लोणी स्टेशन रेल्वे स्थानकावर स्थानबद्ध करून पुढील तपासासाठी हिंगोली जिल्ह्यातील पूर्णा पोलीस स्टेशनच्या ताब्यात पुढील तपासासाठी देण्यात आले
लोणी काळभोर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पोलीस तपासातील पोलीस हवालदार नितीन गायकवाड व पोलीस शिपाई शैलेश कुदळे यांना एका खाजगी बातमी दाराकडून माहिती मिळाली की रेल्वे स्टेशन वर तीन मित्राच्या खुणा संदर्भात चर्चा करत आहेत यातील एकाचे डोक्यावर लाल टोपी असल्याची माहिती दिली यावर त्यांनी आपले वरिष्ठ अधिकारी पोलीस उपनिरीक्षक अमित गोरे यांना याची माहिती दिली त्यांनी लोणी काळभोरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय चव्हाण यांना याची माहिती दिली यावर त्यांनी त्या इसमांना सापळा रचून ताब्यात घेण्याच्या सूचना दिल्या यावर पोलीस उपनिरीक्षक अमित गोरे व त्यांचे तपास पथक लोणी काळभोर रेल्वे स्टेशन येथे पोहोचले त्या ठिकाणी मिळालेल्या माहितीनुसार तिन्ही सम दिसून आले त्यापैकी एकाच्या डोक्यावर लाल टोपी होती या पथकातील काहीजण त्यांच्याजवळ जाऊन माहिती घेण्यासाठी पोहोचले तेव्हा याचा सुगावा लागल्याने ते तेथून पळून जाऊ लागले तेव्हा त्यांचा पाठलाग करून त्यांना ताब्यात घेतले आणि त्यांची चौकशी केली यावर त्यांनी त्यांची नावे आदित्य इस्माईल शेख, मोहम्मद मुजाहिद सिद्धीकी, नय्युम चांद शेख मु. पो. करंजी ता. वसमत जिल्हा हिंगोली अशी माहिती दिली त्यानंतर गोरे यांनी मित्राच्या खुना संदर्भात माहिती घेतली असता त्यांनी सांगितले की त्यांच्या गावातील त्यांचा मित्र शाहरुख शुभम शेख याच्यासोबत जुन्या भांडणावरून दिनांक 29 डिसेंबर 2022 रोजी रात्री नांदगाव पुलाजवळ बोलावून त्यास दारू पाजून मोटरसायकलच्या दोरीच्या साह्याने त्याचा गळा आवळून खून केला पुरावा नष्ट करण्यासाठी त्याची मोटार सायकल व अंगावरील कपडे घटनास्थळापासून पाच ते सात किलोमीटर अंतरावर नेऊन एका पुलाजवळ जाळून नष्ट केले अशी माहिती दिली.
यावर लोणी काळभोर पोलिसांनी परभणी पोलिसांशी संपर्क करून शाहरुख शुभम शेख याचे संदर्भात चौकशी केली असता त्यांना माहिती मिळाली की पूर्ण पोलीस स्टेशन हद्दीत या घटनेची नोंद असून त्याचा खून झाल्यानंतर वागण्यात इसमाविरोधात गुन्हा दाखल आहे त्यावर पूर्ण पोलिसांशी संपर्क करून पोलीस निरीक्षक मारकड यांना या संदर्भात माहिती देऊन या तिन्ही सणांना पुढील तपासासाठी त्यांच्या ताब्यात दिले.
ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय चव्हाण, पोलीस निरीक्षक सुभाष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अमित गोरे पोलिस हवलदार गायकवाड, पाटोळे, पोलीस नाईक नागलोत, जाधव, देविकर, पोलीस शिपाई पुंडे, वीर, कुदळे, पवार, सोनवणे या पथकाने केल
