लोणी-काळभोर (हवेलीनामा ऑनलाईन) पुणे पोलीस आयुक्त कार्यालयाकडून अवैध धंदे तसेच गुन्हेगारावर कडक कारवाई करण्याच्या सूचना मिळाल्यानंतर लोणी काळभोर पोलिसांनी परिसरात चालू असलेल्या गावठी दारू भट्टी उद्ध्वस्त करून दोघाविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रेय चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार, लोणी काळभोर पोलीस ठाणे परिसरातील बल्लाळवस्ती रामदरा रस्त्यावरील हातभट्टी दारू तयार केली जात असल्याची माहिती पोलीस शिपाई वीर यांना मिळाली त्यांनी याबद्दलची माहिती वरिष्ठांना कळवली वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय चव्हाण यांनी पोलीस उपनिरीक्षक अमित गोरे व तपास पथकास या ठिकाणी जाऊन कारवाई करण्याचे आदेश दिले त्यानुसार या पथकाने रामदरा रोड वरील बल्लाळ वस्ती येथे जाऊन छापा टाकला त्या ठिकाणी एका पत्र्याच्या भांड्यामध्ये गुळ तुरटी व पाणी याचे अंदाजे एक हजार लिटर रसायन व साहित्यांशी गावठी दारू बनवीत असताना तेथे शेखर मधुकर काळभोर व रामकुमार जयप्रसाद लोधी ही दोन व्यक्ती त्या ठिकाणी आढळून आल्या, त्या ठिकाणी दहा हजार रुपये किमतीचे 1000 लिटर गावठी हातभट्टी तयार करण्याचे रसायन, एक हजार रुपये किमतीचे पत्र्याचे भांडे असा एकूण 11 हजार रुपये किमतीचा माल मिळून आला त्यातील नमुना घेऊन उर्वरित महाग जागीच नष्ट करण्यात आला.
ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय चव्हाण व पोलीस निरीक्षक सुभाष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अमित गोरे, पोलीस हवालदार गायकवाड, पाटोळे, पोलीस नाईक नागलोत, जाधव, पुंडे, वीर, पोलीस शिपाई कुदळे, पवार, सोनवणे यांच्या पथकाने केली
