थेऊर (हवेलीनामा आॕनलाईन) पूर्व हवेलीतील कुंजीरवाडी गावच्या महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीच्या अध्यक्षपदी रामदास कुंजीर यांची तर उपाध्यक्षपदी सोमनाथ न्हावले व अनिकेत कुंजीर यांची बिनविरोध निवड करण्यात आली, अध्यक्ष सचिन कुंजीर यांनी कार्यकाळ संपल्याने रिक्त झालेल्या पदावर निवडणूक प्रक्रिया घेण्यात आली अध्यक्षपदाची निवडणूक कुंजीरवाडीच्या सरपंच अंजू गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली
यावेळी उपस्थित ग्रामस्थांनी नवनिर्वाचित पदाधिकार्यांचे जलोषात स्वागत करुन गुलाल उधळून आनंदोत्सव साजरा केला यात सरपंच अंजु गायकवाड़, उपसरपंच चंद्रकांत मेमाणे, माजी सरपंच संतोष कुंजीर ,श्रीनाथ पतसंस्थेचे चेअरमन संदीप धुमाळ, शिवसेना शिरुर हवेली संघटक स्वप्निल कुंजीर,कुंजीरवाडी श्रीराम सोसायटीचे चेअरमन दादा धुमाळ, सचिन कुंजीर,बापू घुले , पोलीस पाटील मिलिंद कुंजीर , ग्रामविकास अधिकारी बाळासाहेब कांबळे , विभागप्रमुख सुभाष कुंजीर , भाऊसाहेब कुंजीर , दत्तात्रय कुंजीर , गणेश कुंजीर , पृथ्वीराज कुंजीर , अमर कुंजीर , नंदकुमार कुंजीर , संतोष शिंदे उपस्थित होते
