पुणे (हवेलीनामा ऑनलाईन) मद्याच्या नशेत मित्राच्या बॅगेतून पैसे काढल्याच्या वादातून दोघात झालेल्या भांडणात मित्रानेच आपल्या मित्राचा डोक्यात दगड घालून खून केल्याची घटना कुंजीरवाडी जवळ सोरतापवाडी परिसरात घडल्याचे उघड झाले यावर लोणी-काळभोर पोलीसांनी खुन केल्या प्रकरणी एकास ताब्यात घेतले आहे.
लोणी-काळभोर पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार,या खुन प्रकरणी अंकुश रामराव कोवे (वय ३०, रा. मु. पो. नागझरी ता. किन्वट, जि नांदेड) यास ताब्यात घेण्यात आले आहे, तर अख्तर रहीम सय्यद, कुंजीरवाडी ता. हवेली, असे खून झालेल्या इसमाचे नाव आहे, याप्रकरणी जास्मीन अख्तर सय्यद वय ३५, कुंजीरवाडी ता. हवेली, मुळ रा. मु. पो घारगाव ता. परांडा जि. ऊस्मानाबाद, यांनी लोणी काळभोर शहर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली आहे.
अख्तर सय्यद आणि अंकुश कोवे हे दोघे मित्र होते. दोघेजण सोमवारी रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास कुंजीरवाडी येथील ए. के वाइन्सच्या शेजारील पत्र्याचे शेड जवळ असलेल्या मोकळ्या जागेत दारू पीत होते, त्यावेळी अंकुश कोवे याने अख्तर सय्यद यांच्या बॅगेतून परस्पर पैसे काढून घेतले, तेव्हा सय्यद यांनी घेतलेले पैसे परत मागितले, त्यानंतर त्यांच्यात पैसे मागण्यावरून वाद झाला,यावर सय्यद यांना जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने डोक्यात व पायावर दगड मारून खुन केला आहे, असे जास्मीन यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे, त्यानुसार लोणी काळभोर स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे, पुढील तपास लोणी काळभोर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस उप-निरीक्षक अमोल घोडके करीत आहेत.
