पुणे (हवेलीनामा ऑनलाईन) पुणे सोलापूर महामार्ग हडपसर आकाशवाणी परिसरात फुटपाथ वर अनधिकृत रित्या अनेक वाहने उभी केलेली असून यावर वाहतूक विभाग अथवा महापालिका कुठलीच कारवाई करत नसल्याचे दिसून येत आहे त्यामुळे रस्त्याने पायी चालणाऱ्या नागरिकांना फुटपात उपलब्ध होत नसल्याने महामार्गावरूनच मार्ग प्रमाण करण्याची वेळ येत आहे यातून एखादा अपघात झाल्यास यासाठी कोणाच जबाबदार धरावे हा प्रश्न नागरिक करत आहे
पुणे सोलापूर महामार्गावरून पुणे शहरात प्रवेश करताना 15 नंबर पासून हडपसर गाडीतळ पर्यंत जाताना मुख्य महामार्गालगत असलेल्या पदचारी मार्गावर गॅरेज चालकांनी अनेक नादुरुस्त वाहने सर्रास उभी केलेली असून ही वाहने कधीच निघालेली दिसत नाही त्यामुळे पदचारी नागरिकांना हा मार्ग वापरता येत नाही त्यामुळे त्यांना नाईलाजाने मुख्य रस्त्यावरून जावे लागते अनेकदा दुचाकी, चारचाकी वाहन चालक अशा नागरिकांना पाठीमागून धडकण्याची शक्यता अधिक असल्याने हा पदचारी मार्ग कधी मोकळा होणार असा प्रश्न उपस्थित होतो वाहतूक विभाग यावर कारवाई करणार का हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
