पुणे (हवेलीनामा आॕनलाईन) भारत हा विविधतेने नटलेला देश असून येथे अनेक हिंदू परंपरा एकत्र नांदतात आपापले सण व्रत वैकल्य साजरे करतात यातून आपल्या देशाची संस्कृती किती प्रगल्भ आहे याचाच प्रत्यय येतो नुकत्याच पार पडलेल्या दिवाळी या दीपोत्सवा नंतर उत्तर भारतातील विशेषतः उत्तर प्रदेश व बिहार या प्रांतात सूर्य देवाची पूजा केली जाते यालाच छठ पुजा असे संबोधले जाते या प्रांतातील अनेक बांधव वेगवेगळ्या राज्यात रोजगार मिळविण्यासाठी स्थलांतरित झाले अशाच काही बांधवांनी पुणे शहरात देखील वास्तव्य केलेले असून आपली ही छटपूजा येथेही अतिशय उत्साहाने ते साजरी करतात.

शहराप्रमाणेच हे उत्तर भारतीय बांधव उपनगरातही वास्तव्यात असून पूर्व भागातील वाघोली या उपनगरात मोठ्या संख्येने हे बांधव राहतात त्यांच्या या छटपूजेसाठी भैरवनाथ मंदिराच्या घाटावर विशेष व्यवस्था करण्यात आली आहे, या महोत्सवचे उत्कृष्ट नियोजन अनिल सातव मिञ मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे छटपूजा कमिटीने पुणे महानगर पालिकेच्या विशेष सहकार्याने घाटाची स्वच्छता आणि दिवाबत्तीची व्यवस्था केली असून सुरक्षा व्यवस्थेसाठी मिञमंडळाचे पथक तैनात केले जातील.छटपूजेसाठी सर्व यंञणा ही कार्यरत असून हा उत्सव अगदी आंनदाने साजारा करण्यासाठी भाजपा युवा मोर्चाचे हवेली तालुका अध्यक्ष अनिल सातव व माजी ग्रामपंचायत सदस्य सुनिता सातव यांच्यासह सर्व सदस्य हा महोत्सव साजरा करण्यासाठी विशेष परिश्रम घेत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *