उरुळी कांचन -(हवेलीनामा आॕनलाईन) पुणे जिल्हा माध्यमिक शाळा शिक्षकेतर सेवक संघ व हवेली तालुका शिक्षकेतर सेवक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने मेळावा आयोजित करण्यात आला होता महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळा शिक्षकेतर सेवक संघटनांचे महामंडळाचे सरकार्यवाह शिवाजी खांडेकर यांच्या अध्यक्षेतेखाली 2022 ते 2025 नव्याने त्रैवार्षिक कार्यकारिणी निवड करण्यात आली हवेली तालूक्याची कार्यकारणी निवड ही बिनविरोध झाल्याची महिती खांडेकर यांनी दिली निवड झालेले सदस्य पुढीलप्रमाणे हवेली तालुका शिक्षकेत्तर सेवक संघाच्या अध्यक्षपदी  चिंतामणी विद्यामंदिराचे क्लार्क संजय कांचन यांची निवड झाली तर उपाध्यक्षपदी संत यादवबाबा माध्यमिक विद्यालय शिंदवणेचे शंकर शिंदे यांची निवड झाली.

कार्याध्यक्षपदी न्यू इंग्लिश स्कूल अष्टापूरचे गुणवंत कोतवाल,सहकार्यवाह स्वप्निल म्हस्के, कार्यकारणी सदस्य महादेव तरकसे, शंकर गोगावले, शिवाजी गायकवाड,यावेळी जिल्हा संघटनेचे अध्यक्ष सुखदेव कंद, जिल्हा संघटनेचे उपाध्यक्ष प्रसन्न कोतुळकर, विनोद गोरे उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *