पुणे (हवेलीनामा आॕनलाईन) लोणीकाळभोर पोलिस स्टेशन हद्दीतील नायगाव पेठ येथे पहाटे एका ५४वर्षीय इसमचा खून झाल्याचे निष्पन्न झाल्याने एकच खळबळ उडाली आहे
नायगावपेठ हदीतील मार्गवस्तीच्या जवळ सुभाष भगवंत चौधरी ऊर्फ बाबूतात्या असे इसमाचे नाव असून त्यांचा आज पहाटे खून झाल्याचे संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे या घटनेची खबर मिळताच लोणीकाळभोर पोलिस घटनास्थळी पोहचले असून हा कशामुळे खून झाला व संशयित आरोपीचा शोध पोलिसांनी सुरु केला आहे.
नायगावपेठ हद्दीतील मार्गवस्ती कडून नायगावला जाण्याच्या रस्त्याच्या बाजूला बाबूतात्याचा मृतदेह आज पहाटे काही नागरीकांना आढळून आला ही बाब समजातच लोणीकाळभोर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक सुभाष काळे व त्यांचे सहकारी घटनास्थळी धाव घेतली असून पुढील तपास सुरु आहे.
