पुणे- (हवेलीनामा आॕनलाईन) (बापू धुमाळ) पूर्व हवेलीत ऐन दिवाळीत चिमणी कावळा, सोरट वाल्यांची दिवाळी जोरात असून मोलमजूरी करुन घरात दिवाळीचे समान भरायला पैसे नाहीत पण या जुगारावर अनेकांनी आपली कमाई उडवल्याने घरात दिवाळी की दिवाळ अशी अवस्था निर्माण झाली आहे.

या गोरख धंद्यामुळे सोरट वाले मालामाल झाले असून खेळणार्यावर ऐन दिवाळीत सोरट खेळून दिवाळ खोरीत निघले आहे यावर पोलिस कारवाई करणार का हाच प्रश्न महिलावर्गाकडून उपस्थित केला जात आहे .कमी वेळेत दुप्पट पैसे मिळवण्याच्या आमीषापाई तरुणाई सोरटच्या व्यसनाने भरकटली असून ऐन लक्ष्मी पूजनच्या दिवशी सोरट मध्ये पैसे हरल्यामुळे तरुणावर नख खाण्याची वेळ आली आहे तरी सणासुदीला तरी सोरट बदं होऊन याच्यावर नियंत्रण येईल का असा प्रश्न महिला वर्गाला पडला असून सोरट वाले जोमात तरुणाई कोमात अशी अवस्था झाली असून तेल ही गेले आणि तूपही गेले अशी परिस्थिती पूर्व हवेलीत ऐनदिवाळी त पाहावयास मिळत आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *