थेऊर (हवेलीनामा ऑनलाईन) पुणे शहराच्या पूर्व दिशेला विशेषता पुणे सोलापूर महामार्गावर अनधिकृत जाहिरात फलकांचे पेव फुटले असून यावर कोणीच नियंत्रण घालवे घालू शकत नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे या भागात प्लॉटिंग व्यवसायात उतरलेले अनेक व्यावसायिक मोठमोठे फलक (बॅनर्स) रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या खांबांवर लटकवताना दिसतात तर काही बहाद्दर रस्त्यावर कमानी उभ्या करून आपल्या व्यवसायाची जाहिरात करतात परंतु यामुळे रहदारीस अडथळा निर्माण होऊन अपघाताची शक्यता मोठी असते यावर स्थानिक प्रशासनाने कार्यवाही करण्याची गरज आहे

थेऊर परिसरात अशा अनधिकृत फलकांचे गर्दी वाढली असून जाहिरातीच्या कमानी पहावयास मिळत आहेत या संदर्भात ग्रामपंचायत प्रशासनास विचारले असता यासाठी संबंधित व्यवसायिकांनी कोणत्याही प्रकारची परवानगी घेतले नसल्याचे सांगितले अनधिकृत जाहिराती फलकांवर महसूल विभाग कार्यवाही करतो परंतु याकडे का दुर्लक्ष झाले हा प्रश्न अनुत्तरीत आहे काही वर्षांपूर्वी अशा अनुधिकृत फलकांवर हवेली तहसीलदार यांनी दंडात्मक कार्यवाही केली होती परंतु त्यानंतर अशा अनधिकृत फलकांवर कुठलीच कारवाई झाल्याचे ऐकिवात नाही.

मिळालेल्या माहितीनुसार प्लॉटिंग व्यवसाय ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अनेक सुविधा देण्याचे अमिष दाखवून हे प्लॉट विक्री करतात व त्यातील बऱ्याच गोष्टी ते देण्यात असमर्थ ठरतात परिणामी याचा स्थानिक ग्रामपंचायतीवर मोठा ताण येतो विशेष करून पाणीपुरवठा व गटार लाईन याची मोठी समस्या निर्माण होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *