पुणे (हवेलीनामा ऑनलाईन) अलिकडे शिक्षणा बरोबरच मुलांमधील अन्य कलागुणांना वाव देण्यासाठी अनेक पालक वेगवेगळ्या संस्थांमधून खाजगी प्रशिक्षण देतात यातून त्यांचे बहुआयामी असे व्यक्तिमत्व निर्माण होण्यास मदत होते यात क्रिकेट खो-खो कबड्डी या खेळासह कराटे याचाही समावेश आहे लोणी काळभोर येथील चॅम्पियन्स स्पोर्ट्स कराटे-डो असोसिएशन कराटे संस्थेत अनेक विद्यार्थी कराटे या खेळाचे प्रशिक्षण घेत आहे पुण्यात नुकत्याच सिको काय कराटे इंटरनॅशनल इंडिया महाराष्ट्र यांच्या विद्यमाने ओपन ही कराटे स्पर्धा विमल गार्डन येथे पार पडली. यामध्ये कवडीपाट येथील चॅम्पियन्स स्पोर्ट्स कराटे-डो असोसिएशनच्या ९ खेळाडूंनी सहभाग नोंदवला.कुमिते व काता या प्रकारत ५ सुवर्ण ,४ रौप्य, ५ कांस्य अशा एकूण १४ पदकांची कमाई करत खेळाडूंनी भरघोस यश संपादित केले. वयोगट व वजन गटाप्रमाणे निकाल पुढीलप्रमाणे-

१)ओजस्विनी पुराणिक – कुमिते – रौप्यपदक / काता – कांस्यपदक

२)प्रतीक्षा गुंजोटे – कुमिते – सुवर्णपदक / काता – कांस्यपदक .

३)महिमा कुमदाळे – कुमिते – रौप्यपदक

४)आराध्या बोरावणे – कुमिते – रौप्यपदक

५)आयुष्य मदने – कुमिते – सुवर्णपदक

६) प्रितम गुंजोटे – कुमिते – सुवर्णपदक / काता- सुवर्णपदक.

७) वैभव रसाळ – कुमिते – सुवर्णपदक

८) अलोक पवार – कुमिते – कांस्यपदक / काता – कांस्यपदक .

९)अभिषेक जाधव – कुमिते – रौप्यपदक / काता- कांस्यपदक. पदकांची कमाई करत सर्व टीमने अस्मरणीय यश संपादित केले.हे सर्व खेळाडूं मुख्य कराटे प्रशिक्षक – सेन्साई हेमंत डोईफोडे सर यांच्या मार्गदर्शनात प्रशिक्षण घेत आहेत. या सर्व खेळाडूंना पालकवर्ग विद्यार्थ्यांनी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.या सर्व खेळाडूचे व प्रशिक्षकांचे कौतुक सर्वच क्षेत्रातून होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *