थेऊर (हवेलीनामा ऑनलाईन)  (SHARAD PUJARI)  आपला व्यवसाय वाढावा यासाठी अनेक जण वेगवेगळ्या क्लृप्त्या वापरतात आणि यात बर्‍याच व्यावसायिकांचा फायदा होतो.असाच एक अनोखा फंडा हवेलीत चर्चेचा विषय ठरतो आहे.सर्वसामान्य नागरिकांना हवाई सफरीचा आनंद तसा आवाक्याबाहेर परंतु जर आपण एखादा प्लांट विकत घेतला तर मात्र हे स्वप्न प्रत्यक्षात उतरुन शकते.

कोरोना महामारीनंतर अनेक व्यवसाय डबघाईस आले यात पुणे शहरालगत असलेल्या प्लाॅटींग व्यवसाय देखील सापडला.पुढे काही दिवसानंतर हळुहळू परिस्थितीत बदल होत असताना हवेलीतील तुकडा खरेदीखत नोंदणी बंद करण्यात आली यामुळे तर या व्यवसायातील तरुण वर्ग एकदमच हवालदिल झाला.गेल्या काही दिवसापासून पुन्हा खरेदीखत चालू झाल्यानंतर ग्राहकांना वेगवेगळ्या सोयी सुविधा पुरविण्याचे आमीष दाखवत ग्राहक आपलस करण्याचा प्रयत्न चालू असताना पूर्व हवेलीत हवाई सफरेची भुरळ सर्वसामान्य नागरिकांत चर्चेचा विषय पुढे आला आहे.

प्लाॅटींग व्यवसायात ग्राहकांना जाहिरातीतून वेगवेगळे आमीष दाखवत आकृष्ट करायचे आपला फायदा झाल्यानंतर जाहिरातीमध्ये देण्यात आलेल्या सोयीसुविधेकडे सोयिस्कर दुर्लक्ष करायचे याचा ताण नंतर ग्रामपंचायतीवर येऊन पडतो.विशेषतः पाण्याची सोय आणि गटारलाईन याचा प्रश्न गंभीर होत जातो.केवळ पाण्याची सोय अशी जाहिरात देऊन तेथे ना पाण्यासाठी टाकीची व्यवस्था आणि गटार लाईनच्या पाण्याची सोय  कशी याची काहीच कल्पना दिलेली नसते.

आजपर्यंत कुठेही अशा प्रकारची अनोखी शक्कल वापरलेली ऐकिवात नव्हती परंतु सध्या हवेलीतील नागरिक याची चर्चा करू लागले आहेत. प्लाॅटींग व्यवसायात अनेक मातब्बर मंडळी आहेत परंतु काही जण सर्वसामान्य शेतकरी कुटूंबातील पण आहेत त्यांनी ग्राहकांना आपलस करण्यासाठी कोणती नविन योजना आणावी हा प्रश्न अनुत्तरित आहे.पण हवाई सफरीची चर्चा तर होणारच !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *