थेऊर (हवेलीनामा ऑनलाईन) पुणे शहराचे उपनगर म्हणून विकसित होत असलेल्या लोणी-काळभोर व कदमवाकवस्ती या गावातील डेंगू व चिकूनगुनिया या रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असुन यावर आवर घालणे आवश्यक आहे यासाठी ग्रामपंचायतीने संयुक्तीकपणे काम करण्याची आवश्यकता आहे.कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीतील इंदीरानगर परिसरातील ओम शिल्प बिल्डींग शेजारी गेली अनेक वर्षांपासून साठलेल्या कचर्यामुळे दुर्गंधी व अस्वच्छ वातावरण निर्माण झाले होते याचा महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या माध्यमातून संबंधित ग्रामपंचायतीस संपर्क करुन हा कचरा हटविण्यात आला.

          गेली काही दिवसापासून पूर्व हवेलीत जोरदार पाऊस पडत आहे याचा परिणाम पाणी साठून त्यात डासांची उत्पत्ती वाढली यामुळेच लोणी-काळभोर परिसरात डेंगू व चिकूनगुनिया या रुग्णांच्या संख्येत भरपूर वाढ झाली आहे सध्या या परिसरात दोनशे ते अडीचशे रुग्ण आढळून आले आहेत त्यामुळे भारतीय जनता पक्षाचे कमलेश काळभोर यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी यांना यावर त्वरित उपाययोजना करण्याबाबत एक पत्र दिले आहे.
             कदम-वाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीत इंदिरा नगर वार्ड क्रमांक 6 मधील कचराकुंडीमुळे या ठिकाणी खूप दुर्गंधी पसरली होती, आणि याठिकाणी कचऱ्यामुळे रस्त्यावर राडारोढा निर्माण झाला असल्यामुळे शाळकरी मुलांना आणि येथील नागरिकांना याचा खूप त्रास सहन करावा लागत होता, या विषयीची तक्रार येथील सोसायटीने लेखी स्वरूपात केली होती, याची ग्रामपंचायत कदम-वाकवस्तीच्या सरपंच गौरी चित्तरंजन गायकवाड, ग्रामविकास अधिकारी अमोल घोळवे, यांनी याची दखल घेतली, या कामात शब्बीर पठाण, ग्रामपंचायत सेवक हनुमंत थोरात, सचिन पवार, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे  राम भंडारी, अमन शेख यांनी या सामाजिक कार्यात सहभाग नोंदवून जे सी बी, मशीनचा वापर करून साफसफाई करण्यासाठी मदत केली.
          वाढत्या रोगराईला प्रतिबंध करण्यासाठी दोन्ही ग्रामपंचायतीने एकत्रितपणे काम केले तर याला आळा बसेल अशी भावना ग्रामस्थांकडून व्यक्त केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *