पुणे (हवेलीनामा आॕनलाईन) लोणीकाळभोर येथील दैनिक पुण्यनगरीचे प्रतिनिधी धनराज तुकाराम साळूंके(वय५२)यांचे अल्पश्या आजाराने आज दुपारी चार वाजता उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले त्यांच्या मागे भाऊ,बहीण, पत्नी,एक मुलगी एक मुलगा असा परिवार आहे

धनराज सांळूके हे गेली दहा वर्षापासून बातमीदार म्हणून कार्यरत होते तसेच हवेली तालुका पञकार संघाचे क्रियाशील सदस्य म्हणून कार्यरत होते,अत्यंत मितभाषी व हसतमुख व प्रामाणिक व्यक्तीमत्व असलेले पत्रकार होते.त्यांच्या अचानक जाण्याने हवेली तालुक्यातील पत्रकार क्षेत्रात एक पोकळी निर्माण झाली आहे.अशा शब्दांत महाराष्ट्र राज्य मराठी पञकार संघाचे जिल्हाध्यक्ष सिताराम लांडगे यांनी त्याच्या आठवणीना उजाळा दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *