थेऊर (हवेलीनामा ऑनलाईन) पुणे सोलापूर महामार्गावरील कुंजीरवाडी येथील पर्यावरण फाऊंडेशनच्या माध्यमातून गाव आणि परिसरात पर्यावरण पुरक उपक्रम राबवले जातात यात वृक्ष लागवड व संगोपन या बरोबरच स्वच्छता मोहिम देखील घेतली जाते गेल्यावर्षीपासून या गावात नवराञ उत्सवात घरोघरी बसविण्यात आलेल्या घटाचे दान हा उपक्रम हाती घेतला धार्मिक भावना असलेल्या या विषयात नागरिकांना याचे महत्त्व समजावून दिले याचा पर्यावरणास कसा व किती लाभ होणार आहे हे सांगितल्यावर नागरिकांनी यासाठी अक्षरशः रांगा लावल्या.

 

नुकताच नवराञ उत्सव पार पडला घटासाठी घरोघरी चांगल्या प्रतीची माती एक घट (मडके) वेगवेगळे धान्य यात मिश्रण करुन नऊ दिवस वेगवेगळ्या फुलांची माळ घातली जाते अशा प्रकारे हे घट नऊ दिवसांनंतर प्रवाहित पाण्यात विसर्जन करण्याची प्रथा आहे.अलिकडे नद्यांच्या प्रदूषणाची पातळी भयंकर वाढलेली असून नद्यांचे पाणी वापरण्या योग्य पण राहिलेले नाही अशा पाण्यात हे घट विसर्जित करणे किती योग्य आहे याची कल्पनाच करवत नाही त्यामुळे पर्यावरण समितीने गावातील सहकार्‍च्या माध्यमातून घटदानाची संकल्पना मांडली आणि यात सर्वांनी सहकार्य केले.

यात जमा झालेले घट पर्यावरण समितीकडून डोंगर दर्यात लावलेल्या झाडांना पोषक ठरणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *