थेऊर (हवेलीनामा ऑनलाईन) लोणी-काळभोर येथील टायनी हार्ट प्रि स्कुल येथे छोट्या चमुंनी भारतीय संस्कृतीचा अनुभव घेत भोंडल्यात मनसोक्त आनंद लुटला.

यावेळी संचालिका प्रियांका ढम यांनी भोंडल्याची माहिती दिली, भोंडला हा पश्चिम महाराष्ट्रात व कोकणात प्रचलित असलेला स्त्रियांच्या सामुदायिक खेळाचा प्रकार आहे. नवरात्रीचे नऊ दिवस आणि दसऱ्याच्या दिवशी हा खेळला जातो. घटस्थापनेच्या दिवसापासून संध्याकाळी अंगणात भोंडला खेळला जातो. एका पाटावर हत्ती काढून त्याची पूजा करतात.ही मराठी संस्कृती आता लोप पावत चालली आहे म्हणून मराठी संस्कृती जपणूक करण्यासाठी भोंडला आणि दांडिया चे आयोजन करण्यात आले होते यावेळी चिमुकल्यांनी डान्स करून दांडिया खेळून आणि भोंडला खेळून आपला आनंद व्यक्त केला त्याचबरोबर कन्या पूजन देखील करण्यात आले वयोवृद्ध महिलांनी देखील उस्फूर्तपणे आपला सहभाग घेतला होता भोंडल्याची गाणी म्हणून त्यावर सर्व वयातील महिला तरुणी आणि छोट्या बलचमुनी ठेका धरला होता. तृप्ती पिसाळ आणि भाग्यश्री भिकोले,प्रीती भोसले यांनी भोंडल्याची गाणी गायली आणि कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले यावेळी मुलांचे पालक उपस्थित होते त्यांनीही उस्फूर्तपणे आपला सहभाग नोंदवला होता.सांगता खिरापत वाटून झाली खिरपतीचा देखील सर्वांनी आनंद घेतला. कार्यक्रमासाठी हेमलता ढम आणि पालक यांनी सहकार्य केले .शिवाय आपली मराठी संस्कृती मधील असे काही खेळ आता लुप्त होत चालले आहेत तर ते लुप्त होऊ नयेत यासाठी सर्वांनी प्रयत्नशील राहू असे देखील प्रतिपादन करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *