पुणे (हवेलीनामा आॕनलाईन) ग्राहकांमध्ये विम्याविषयी अधिक जनजागृती करून या व्यवसायात उल्लेखनीय कामगिरी केली त्याबद्दल एल आय सी च्या 951 शाखेतर्फे अधिकृत विमा प्रतिनीधी मृणाल प्रथमेश गुरव यांना सन 2022 सालचा “सर्वोत्कृष्ट विमा प्रतिनिधी” या सन्मानाने गौरविण्यात आले.

मृणाल प्रथमेश गुरव या ग्राहकहीतदक्ष, प्रामाणिक आणि आर्थिक नियोजनात कर्तव्यदक्ष विमा प्रतिनिधी असल्याचा उल्लेख या शाखेचे मुख्य व्यवस्थापक महेंद्र इंगळे यांनी केला.

भारत सरकारच्या अर्थकारणाचा कणा असलेली व भारतातील सर्वात मोठी , सरकारच्या मालकीची विमा कंपनी म्हणून एल आय सी ला ओळखले जाते. या कंपनीच्या विमा पाॅलिसींच्या माध्यमातून विमा ग्राहकांचे आर्थिक नियोजन करणे, त्यांच्या सेवानिवृत्तीनंतरचे नियोजन करणे, मुलांचे शिक्षण व लग्न यासाठी आर्थिक तरतूद करणे, मुदत योजनेच्या माध्यमातून मोठे जोखीम उपभोगता देणे, महिलांना आर्थिक सक्षम करण्यासाठी बचत योजना देणे या सर्व सेवा ग्राहकांना देताना विशेष आनंद होतो. तसेच या वाटचालीत विकास अधिकारी संजय भाईक यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. अशी भावना सत्काराला उत्तर देताना मृणाल गुरव यांनी व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *