पुणे (हवेलीनामा आॕनलाईन) वालचंदनगर पोलिसांनी मंदिरात झालेल्या साहित्य चोरीतील आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून तब्बल एक लाख अकरा हजाराचा मुद्देमाल हस्तगत करुन दोन जणांना अटक केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वालचंदनगर पोलिस स्टेशन हद्दीतील पिटकेश्वर गावचे श्री पिटकेश्वर मंदीर व सिरसवडी गावच्या हद्दीतील मारुती मंदीर ता.इंदापूर जि.पुणे याठिकाणी अज्ञात चोरट्यानी मंदिरातील साहित्य चोरी केल्याची घटना घडली या घटनेचा तपास करण्यासाठी उपविभागिय अधिकारी गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक बिरप्पा लातुरे यांनी तपास पथक तयार केले गावातील सी सी टीव्ही फुटेजच्या माध्यमातून गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळवून गणेश बाप्पू भांडे(वय३४)रा.वकीलवस्ती इंदापूर,विकास बाळासाहेब भोसले (वय३०)रा.जुना बाजारतळ,विजयचौक अकलूज

यांना ताब्यात घेतले त्यांच्याकडे गुन्ह्यांच्या अधिक चौकशी केली असता त्यांनी या गुन्हाची कबूली दिली दोन्ही मंदीरातून सहा घंटा व दोन स्पीकर मशीन असा ५६०००रुपये किंमतीचा माल तसेच गुन्हा करत्यावेळी वापरलेली मोटरसायकल ५५०००रु असा एकूण १,११०००रुपये किंमतीचा मुद्देमाल ताब्यात घेतले.

ही कामगिरी पुणे ग्रामीणचे पोलिस अधिक्षक अभिनव देशमुख,अप्पर पोलिस अधिक्षक मिलिंद मोहिते,उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली वालचंदनगरचे पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक बिरप्पा लातुरे,सहाय्यक पोलिस फौजदार शिवाजी निकम पोलिस हवालदार शैलेश स्वामी, पिटकेश्वर पोलिसपाटील सचीन येरळकर,पोलिस मिञ ऋषीकेश ननवरे,समीर शेख यांनी केली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *