पुणे (हवेलीनामा आॕनलाईन) कामाचा ताण वाढल्याने मेटाकुटीस आलेल्या पोलिसांच्या सुट्ट्यांमधे व वर्ग तीन मधील रिक्त पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्याचा राज्य सरकारने आपल्या मंत्रीमंडळात निर्णय घेतला आहे.

पोलीस वर्गातील शिपाई ते पोलीस निरीक्षक यांच्या नैमित्तिक रजा 12 वरुन 20 पर्यंत वाढविण्यात आल्या आहेत.पाचव्या वेतन आयोगाने सुचविले शिफारशीनुसार राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना एका वर्षात 12 ऐवजी 8 रजा मंजूर करण्याचा राज्य सरकारने निर्णय घेतला नंतर विशेष बाब म्हणून या 12 दिवसाच्या नैमित्तिक रजा मंजूर करण्यात आल्या.मात्र पोलिसांवर सण, उत्सव,वरिष्ठ पदाधिकाऱ्यांचे बंदोबस्त यामुळे कामाचा ताण वाढतो त्यामुळे या रजा वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला.

पोलीस प्रशासनातील वर्ग अ आणि ब गटातील अधिकाऱ्याप्रमाणेच क प्रवर्गातील लिपीकांची रिक्त पदे देखील राज्य आयोगामार्फत भरण्यात यावीत असे मंत्रिमंडळाने ठरविले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *