पुणे (हवेलीनामा आॕनलाईन) खरेतर आदी काळापासून आईचे आपल्या मुलाच्या बाबतीत असलेले प्रेम हे शब्दातीत असून याची कसलीच तुलना होऊ शकत नाही.आपल्या बाळासाठी सर्व काही करण्याची तिची तयारी असतेच.आजच्या अधुनिक काळात अनेकजणांच्या तक्रारी असतात की माझ्यासाठी आई बाबांकडे वेळ नाही तर याला उत्तर म्हणजे नुकत्याच कोण बनेगा करोडपतीच्या विजेत्या कविता चावला होत.
आपल्या विद्यार्थी दशेत असताना तत्कालीन परिस्थितीमुळे शिक्षण पूर्ण करता आले नाही परंतु ज्ञान संपादन करण्याची भूक त्यांनी आपल्या कौटुंबिक जीवनात पूर्ण करत राहिल्या.सन 2000 मध्ये सुरु झालेल्या कोण बनेगा करोडपती या लोकप्रिय कार्यक्रमात आपला सहभाग व्हावा म्हणून यासाठी केलेली तयारी त्याचे फलित तब्बल 22 वर्षांनंतर सन 2022 साकारले.

या कार्यक्रमादरम्यान त्यांनी दाखवलेला आत्मविश्वास आणि बुध्दीची चुणूक अवाक करणारी ठरली फारच थोड्या स्पर्धकांना या पाडावापर्यंत पोहोचता येत.कविता चावला यांनी स्पर्धेदरम्यान आपला विनोदी स्वभावाची झलकही दाखवली.प्रत्येक गोष्ट ही आनंद प्रदान करणारी संधीच असते हे त्यांनी यात स्पष्ट केले.
या कार्यक्रमात त्यांचा मुलगा आणि वडील उपस्थित होते मुलाच्या शिक्षणासाठी घेतलेल्या कर्जाची फेड करण्यासाठी त्यांनी मेहनत घेतली पन्नास लाखाच्या प्रश्नांपर्यंत कोणतीही जीवनवाहिनी (लाइफलाइन)चा आधार घेतला नाही.प्रत्येक प्रश्नाचे अभ्यासपूर्ण उत्तर देऊन त्यांनी एक कोटी रुपयांचे बक्षीस जिंकले.
