थेऊर (हवेलीनामा ऑनलाईन) सध्या देशात गुरांमधील विषाणुजण्य ताप चर्मरोग लंपी फोफावत असून यावर प्रतिबंध लावण्यासाठी शासकीय यंत्रणा युध्द पातळीवर कामाला लागल्या आहेत. सर्व शासकीय पशुवैद्य आठवड्यातील सातही दिवस कामात गर्क आहेत.नुकत्याच काढलेल्या आदेशानुसार सर्व पशुवैद्य सकाळी 8 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत काम करतील तसेच कोणत्याही अत्यावश्यक परिस्थितीत चोविस तास ही सेवा उपलब्ध असेल असे जाहीर करण्यात आले आहे

हवेली तालुक्यात सध्यातरी परिस्थिती नियंत्रणात आहे आणि कुठे या आजाराची गुरे आढळून आले नाहीत लोणी-काळभोर येथे काही संशयीत रुग्ण गुरे आढळून आल्याने तेथे लसीकरण चालू करण्यात आले आहे.आतापर्यंत लोणी-काळभोर येथे पाच गुरांना लागण झालेली होती त्यापैकी तीन गुरे रोगमुक्त झाले असून दोन गुरांवर उपचार सुरु आहेत संपूर्ण गावात लसीकरण चालू करण्यात आले आहे.अशी माहिती पशुवैद्य डाॅ.निता लाठूकर यांनी दिली.

याविषयावर लंपी संसर्ग समन्वयक म्हणून काम करणारे डबेटवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, हवेलीतील लोणी-काळभोर, आळंदी म्हातोबा, शिंदवणे, पिंपरी सांडस वडकी,उरुळी देवाची,खानापूर, खडकवाडी,कोंढवा,मुंढवाआदी ठिकाणी काही संक्रमित गुरे आढळल्याने या भागात लसीकरण चालू आहे.आजपर्यंत 16 हजार जनावरांचे लसीकरण पूर्ण झाले असून आजही ते चालू आहे.आपल्या परिसरातील गुरांवर लक्ष ठेवून अशी लक्षणे आढळून आल्यास तर सहकार्य करा.

जरी एखाद्या जनावरास अशी लक्षणे दिसली तर ते जनावर कोमेजते,ताप येतो व चारा खात नाही. अशी लक्षणे दिसून आली तर ताबडतोब पशुवैद्यांशी संपर्क करावा.संपर्क क्रमांक डाॅ.जाधव (7757020107) किंवा साथरोग समन्वयक डाॅ.डबेटवार (7350542583) .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *