थेऊर (हवेलीनामा ऑनलाईन) पंढरपुरातील श्री विठ्ठल रुख्मिणी दर्शनासाठी बांधण्यात आलेल्या सात मजली दर्शन मंडपा ऐवजी तिरुपती बालाजी दर्शन मंडपाच्या धर्तीवर त्याची उभारणी करण्यात येणार आहे.सात मजली लवकरच पाडण्यात येणार असून तशी पंढरपूर विकास आराखडय़ात तरतूद करण्यात आली आहे.जिल्हाधिकारी मिलिंद शंकरभर यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली.

सध्या अस्तित्वात असलेल्या सात मजली दर्शन रांगेची उभारणी 1987 मध्ये तत्कालीन कार्यकारी अधिकारी प्रभाकर देशमुख यांनी केली होती याच दर्शन मंडपाचा उपयोग आज होत आहे यावर तिरुपती येथील दर्शन रांगेच्या धर्तीवर दर्शन व्यवस्था तयार करता येईल का याची चाचपणी चालू असून सध्या अस्तित्वात असलेल्या मंडपाच्या जागी वाहनतळ व देवस्थानचे कार्यालय उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.तिरुपती येथील दर्शन व्यवस्था पाहण्यासाठी एक शिष्टमंडळ गेले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *