थेऊर (हवेलीनामा ऑनलाईन) आज सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास नायगाव येथील मार्गवस्तीवरील बंद घराचे कुलूप तोडून घरातील कपाटात ठेवलेले तब्बल चार लाख नव्वद हजार रुपये व दोन अंगड्या चोरट्यांनी पळवल्याची धक्कादायक घटना घडल्याचे समोर आले आहे.
घडलेल्या घटनेत थेऊर येथील फळबाग व्यावसायिक प्रकाश म्हस्के हे केळी पेरु सीताफळ आदी फळांचे घाऊक व्यावसायिक आहेत.ते नायगाव येथील मार्गवस्तीवर आपल्या कुटूंबासह राहतात.आज पहाटे पावणेसहा वाजता ते आपल्या मित्रासह एक दिवसीय सहलीसाठी गणपतीपुळे येथे घराला कुलूप लावून गेले.दरम्यान सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास त्यांच्या शेजारी राहणाऱ्यांनी त्याचे घरातून दोन जण बाहेर पडून पळत गेल्याचे पाहिले त्यावर त्यांनी फोनवर याची माहिती म्हस्के यांना दिली दरम्यान सर्वत्र पाऊस पडत असल्याने कोणीतरी आडोशाला उभा असेल असे वाटले परंतु घरातील सर्व वस्तू अस्ताव्यस्त पडलेल्या व कपाटाचे दार उघडे दिसले त्यावरून घरात चोरी झाल्याची खात्री झाली.
प्रकाश म्हस्के यांच्याकडे व्यापारासाठी लागणारी रोख रक्कम तीन लाख नव्वद हजार तर भाड्यापोटी आलेली ऐंशी हजार रुपये व अन्य वीस हजार अशी तब्बल चार लाख नव्वद हजाराची रोख रक्कम व दोन सोन्याच्या अंगड्या असा ऐवज पळवण्यात आला.
