थेऊर (हवेलीनामा ऑनलाईन) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील प्रवेश द्वारावर साठणार्या पाण्याची कायमस्वरुपी विल्हेवाट लागावी यासाठी काम होणे अपेक्षित आहे, या शाळेत शिक्षण घेणारी गरीब व सर्वसामान्य कुटुंबातील मुल आहेत त्याच्या आरोग्याचा प्रश्न उपस्थित होत असून यावर शासन म्हणून कार्यरत असलेल्यांनी असे दुर्लक्ष करणे हे योग्य आहे का असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत.
थेऊर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत जवळपास चारशेच्या विद्यार्थी शिक्षण घेतात,यासाठी एकुण चौदा शिक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे.येथे पहिली ते तिसरीच्या प्रत्येकी तीन तुकड्या तर चौथीच्या चार तुकड्या आहेत.शाळेच्या मैदानावर पेवर ब्लाॅक बसवलेले आहेत यावर पावसाचे पाणी साठल्याने मातीचा थर बसतो त्यावरून अनेक विद्यार्थी घसरुन पडतात.
आज शाळेत दहाच शिक्षक असल्याचे समजले व उर्वरित चार शिक्षकांपैकी दोघे पंचायत समितीत शासकीय कामासाठी तीन दिवस असल्याचे तर दोघे रजेवर असल्याचे समजले.शाळेचा उपस्थिती पट पाहता अनुपस्थित शिक्षकांच्या जागी अन्य शिक्षकांची व्यवस्था करणे क्रमप्राप्त आहे परंतु याकडे वरिष्ठ दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे यात विद्यार्थ्यांचे नुकसान होताना दिसत आहे.अगोदरच दोन वर्षे कोरोनामुळे विद्यार्थी अभ्यासात कमजोर राहिला आहे त्यात अशी परिस्थिती असेल तर मग विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास कसा होणार?
