थेऊर (हवेलीनामा ऑनलाईन) कदमवाकवस्ती ग्रामपंचायत परिसरात स्वच्छता कायम राहण्याच्या दृष्टिकोनातून कचरा गोळा करण्यात येतो तरीही लोणीफाट्यापासून लोणीस्टेशन कडे जाण्यासाठी सर्विस रोड तयार करण्यात आला आहे या रस्त्यावर ओढ्यातून वाहून जाणारे पाणी अनेकवेळा तेथे जमा होत असे तसेच परिसरातील कचरा तिथे टाकण्यात येत त्यामुळे घाणीचे साम्राज्य निर्माण होई याचा ग्रामपंचायत प्रशासनाकडून कायमचा तोडगा काढण्यासाठी सुमारे आठ लाख रुपये खर्च करून मोठी सिमेंटची लाईन टाकण्यात येत आहे या कामाची सुरुवात सरपंच गौरी गायकवाड यांनी केली.

पुणे सोलापूर महामार्गावर विकसित असलेली ग्रामपंचायत म्हणून कदमवाकवस्तीचा नावलौकिक आहे.त्या देशाचा अमृत महोत्सवी वर्षात स्वच्छता अभियान अधिक प्रभावी राबविण्यात येत आहे याच अनुषंगाने गावात कुठेही उघड्यावर कचरा टाकू नये याची खबरदारी घेतली जात आहे.एम आय टी विद्यापीठ चौकात महामार्गालगत सर्विस रोडवर सांडपाणी साठत होते त्यात परिसरातील काही जण कचरा टाकत असल्याने दुर्गंधी पसरत होती यावर ग्रामपंचायतीने कायमस्वरुपी उपाययोजना करण्याचे ठरविले व 36 इंची सिमेंटच्या नळ्या टाकून बंदिस्त गटार तयार करण्यात येत आहे आज गावच्या सरपंच गौरी गायकवाड यांनी या कामाचे उद्घाटन केले यावेळी सदस्य नासिर पठाण उपस्थित होते.
सरपंच गौरी गायकवाड यांनी परिसरातील नागरिकांना आवाहन केले आहे की,कचरा घंटागाडीतच टाकावा आपला परिसर स्वच्छ राहिला तर आपले आरोग्य निट राहिल.जर कोणी उघड्यावर कचरा टाकला तर त्याच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल.
