थेऊर (हवेलीनामा ऑनलाईन) सर्व विद्यांचा अधिष्ठाता म्हणून ज्याची आराधना केली जाते त्या भगवान श्री गणेशाच्या गणेशोत्सव साजरा होत असताना नानाविध स्वरुपात बाप्पा आपल्याला दर्शन देत असून येथील भगवान श्री चिंतामणी गणपतीस ऋषी मुनी यज्ञयाग करत असल्याचा देखावा चिंतामणी गणपतीच्या पुजाऱ्यांकडून साकारण्यात आला आहे.
अष्टविनायकात पाचवे स्थान असलेला श्री चिंतामणी गणपती या उत्सव काळात भक्तांना वेगवेगळ्या रुपात दर्शन देत आहे.आज पुरातन काळातील ऋषी मुनी आपल्या वेद मंत्रांनी भगवंताला आळवणी करताना दाखविण्यात आले आहे.गाभाऱ्याला कुटीचे रुप देण्यात आले असून यज्ञकुंडात ऋषी आहुती घालत आहेत. त्यामुळे सर्वत्र मंगलमय वातावरण निर्माण झाले असून हे दृश्य आपल्या डोळ्यात साठवून ठेवण्यासाठी भक्त दर्शन रांगेत उभे असल्याचे दिसले.
