पुणे (हवेलीनामा ऑनलाइन) सोरतापवाडी येथील महादेवनगर या वस्ती मधील लोकांना वीज बिल भरण्या संदर्भात समस्यांना सामोरे जावे लागत असून येथील संतप्त नागरिकांनी अँड. सचिन सावंत यांच्या नेतृत्वाखाली वीज वितरण महामंडळाच्या उरुळी कांचन कार्यालयात कनिष्ठ अभियंता सुरवसे यांना निवेदन दिले
सोरतापवाडी, महादेवनगर वस्तीमध्ये ५० ते ६० कुटुंब राहतात ही सर्व कुटुंब कष्टकरी व गोरगरीब असल्यामुळे कोरोनाच्या पूर्ण कालावधी विज बिल भरणे हे शक्य न झाल्याने वीज बिल वाढून आले आहे व त्या वाढीव वीज बिल याला व्याजही लावले त्याने वीज बिल भरणे अशक्यप्राय झाले आहे. कोरोना कालावधीत उर्जा मंत्र्यानी कोणाचाही वीज पुरवठा खंडित केली जाणार नाही असे वक्तव्य केले होते. विज महामंडळ मात्र सक्तीने वसुली करत आहे ,कोरोना काळात सर्व काम धंदे बंद होते पण अजूनही सामान्य माणसाचे काम धंदे व्यवस्थीत नाही,शेतकरी सुद्धा अडचणीत आहे. तरी विज महामंडळाने थकित बीलावर व्याज ही आकारायला सुरुवात केली आहे. ग्राहकांनी काही तरी गहाण ठेवून बील भरावे लागणार आहे ,तरी उर्जा मंत्र्यानी दिलेला शब्द पाळवा, वीज महामंडळाने सक्तीची वसुली थांबवावी व आलेल्या वीजबील कमी करावे रक्कमे वर भरण्यास टप्पे करुन दयावे ही विनंती करण्यात आली.
जर वीज ग्राहकांच्या अश्या पद्धतीने वीज पुरवठा खंडित केला तर झोपडपट्टी सुरक्षा दलाच्या माध्यमातून आम्ही तीव्र स्वरूपाचे आंदोलन कार्यालयासमोर करू अश्या स्वरूपाचे निवेदन कनिष्ट अभियंता उरुळी कांचन ,हवेली, पुणे यांना दिले यावेळी अँड. सचिन सावंत पाटील, अँड़. संतोष गायकवाड, दिपक गिरी, आकाश थोरात,चंद्रकांत कावळे ,शुभम माटे हे उपस्थित होते.
यावर सहाय्यक अभियंता प्रदीप सुरवसे यांनी सांगितले की, कोरोनामुळे सामान्य नागरिकांचे जगणे अवघड झाले आहे परंतु अनेकांची परिस्थिती चांगली आहे त्यांनी वीज बिल वेळेत भरले पाहिजे अडचणीत असलेल्या नागरिकांना सहकार्य केले जाईल परंतु चालू बिल भरून थकबाकी बिलाचा हिस्सा भरला पाहिजे.
