पुणे (हवेलीनामा ऑनलाइन) स्वयंपाकाच्या गॅसच्या किमतीत तब्बल २५ रुपयांची वाढ केल्याने सर्वसामान्य जनतेला मोठा आर्थिक फटका बसणार आहे त्यामुळे महिन्याचे बजेट विस्कळित झाले असून गॅस वापरणे बंद करून पुन्हा पारंपरिक चुली मांडण्याची वेळ येऊन पोहोचली आहे अशी जळजळीत प्रतिक्रिया ग्रामीण भागातील महिलांनी दिली आहे

       कोरोना महामारीमुळे अनेकजण बेरोजगार झाले असताना संसाराचा गाडा हाकने दुरापास्त झाले आहे त्यात दैनंदिन जीवनातील जीवनावश्यक वस्तूंच्या किमती आभाळाला भिडल्या आहेत हातावर पोट असणाऱ्या नागरिकांचे जगणे दिवसेंदिवस अवघड होतं आहे रोजच्या लागणाऱ्या आवश्यक वस्तू पैकी म्हणजे स्वयंपाकाचा गॅस जो गेल्या पंधरा दिवसांत रु ५० नी वाढला याचा परिणाम ग्रामीण भागात अंगणात चुली पेटू लागल्या.
         गॅसवरील सबसिडी बंद झाल्याने घरगुती वापराच्या गॅसवर पूर्ण किंमत मोजावी लागते आज ही प्रति सिलेंडर ९०० रुपयांच्या घरात पोहोचली आहे. डाळी तेल यांनी अगोदरच उचांक गाठला आहे.
         “अगोदरच लॉकडाऊन मुळे हैराण झालेल्या नागरिकांना इंधन वाढीचा दररोज धक्का बसतो त्यात घरगुती वापरासाठी असलेल्या गॅसच्या किमती हजारी गाठण्यासाठी शक्यता आहे अशीच परिस्थिती राहिली तर आत्महत्या वाढतील आणि याला सर्वस्वी शासन जबाबदार असेल”.
                 चंद्रभागा सयाजी काकडे
          (माजी सभापती पंचायत समिती, हवेली)
        “उज्वला योजनेच्या माध्यमातून गरीब कुटुंबातील महिलांना मोफत गॅस जोडणी दिली यातून गॅसची सवय लावली मोदी सरकार योजना जाहीर करते व त्याची सवय लावते परंतु त्यानंतर हे सामान्य माणसाला परवडत नाही सध्या चूल पेटवावी म्हटले तर त्यासाठी राकेल उपलब्ध नाही रेशनकार्ड वर मिळणारे राकेल गेल्या अनेक वर्षांपासून बंद झाले त्यामुळे चूल पेटवण्यासाठी अक्षरशः प्लास्टिकच्या पिशव्या वापरल्या जातात याचा किती दुष्परिणाम होणार याची जाणीव होत नाही”
                        सुनिता धुमाळ,
         (माजी सरपंच कुंजीरवाडी ग्रामपंचायत)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *