पुणे (हवेलीनामा आॕनलाईन) थेऊरफाटा कुंजीरवाडी (ता. हवेली ) येथील श्रीनाथ पतसंस्थेला सन २१/२२ या आर्थिक वर्षात १.२५ कोटी रुपये निव्वळ नफा होऊन संस्थेच्या सभासंदाना १२ टक्के लाभांश संस्थेचे संस्थापक चेअरमन संदीप धुमाळ यांनी जाहीर केला.

पुणे व ठाणे जिल्हा महाराष्ट्र राज्य कार्यक्षेत्र असलेल्या श्रीनाथ पतसंस्थेची २२ वी वार्षिक साधारण सभा जिजाऊ मंगल कार्यालय थेऊरफाटा येथे संपन्न झाली यावेळी सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी बोलताना चेअरमन धुमाळ यांनी आपले मनोगत व्यक्त केले

कोविडमुळे आर्थिक क्षेत्राचे खुप मोठे नुकसान झाले आहे जास्त करून बँक आणि सहकारी संस्था यांना खूप मोठा फटका बसला आहे तरी सुद्धा आपल्या संस्थेने भरीव कामगिरी करून सभासदांना लाभांश वाटप केले आहे. यावेळी कुंजीरवाडीच्या माजी सरपंच सुनिता धुमाळ, जेष्ठ संचालक श्री महादेव धुमाळ, माजी सरपंच सचिन तुपे, ज्ञानेश्वर धुमाळ,माजी उपसरपंच दत्तात्रय कुंजीर, संभाजी आंबेकर,अजय कुंजीर, राहुल धुमाळ,दीपक खटाटे,गोकुळ ताम्हणे, वैशालीताई मेमाणे व सर्व संचालक मंडळ उपस्थित होते .

यावेळी ज्या सभासदांच्या पाल्यांनी इयत्ता १०वी व १२वी परीक्षेत ८० टक्केच्या वर गुण मिळवले अशा गुणवंत विद्यार्थी गौरव करण्यात आला संस्थेच्या सभासदांची विविध पदावर निवड झाली यामध्ये नायगावचे सरपंच पदी जितेंद्र चौधरी, श्रीराम वि.का.सोसा. चेअरमनपदी दादासाहेब धुमाळ व व्हाईस चेअरमनपदी संदीप गोपीचंद धुमाळ यांची निवड झाल्याबद्दल यांचेही अभिनंदन व गौरव करण्यात आला.

पतसंस्थेला २०२१-२०२२ वर्षात १.२५ कोटी रुपयाचा निव्वळ नफा झाल्याचा सांगून पतसंस्थेच्या ३१ मार्च २०२२ अखेर ३२ कोटी ८० लाख रुपयांच्या ठेवी, २५ कोटी ३१ लाख रुपयाचे कर्ज वाटप , तसेच गुंतवणूक १७ कोटी ७२ लाख रुपयाची केलीली आहे. संस्थेचे एकूण खेळते भांडवल ४७ कोटी ८२ लाख असून संस्थेची वसुली ९२. ४२ टक्के असून एनपीए ० टक्के आहे . या प्रकारची माहिती संस्थेचे संस्थापक चेअरमन संदीप धुमाळ यांनी दिली . सभेचे अहवाल वाचन व सूत्र संचालन संस्थेचे कार्यकारी संचालक ज्ञानेश्वर धुमाळ यांनी केले .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *