थेऊर (हवेलीनामा ऑनलाईन) गणपती उत्सवातील श्री चिंतामणीचे स्वरुप साक्षात जेजुरीच्या मार्तंड रुप भक्तांना लोभस व प्रसन्न करणार दिसून येत आहे.
महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेला जेजुरीचा खंडेराया हा साक्षात भगवान शंकराचा अवतार आहे येथे खोबरे भंडाऱ्याची सोनेरी उधळण परिसर उजळून टाकते.नवदांपत्यास आपले आशिर्वाद कायम असतात.
गणेशोत्सवात सर्वत्र अनेकविध देखावे सादर होत असतात.अष्टविनायकापैकी प्रसिद्ध असलेल्या विनायकांच्या दर्शनासाठी भक्त मोठी गर्दी करत आहेत. थेऊर येथील श्री चिंतामणीचे दररोज नवनवीन लोभस रुप देखील अनेकांना भावताना दिसतय.आज देवालयाचे पुजारी आगलावे बंधू यांनी जेजुरीच्या खंडेरायाच्या स्वरुपात बाप्पा सजवला आहे.डोक्यावर शिलेदार मुकूट तसेच भंडारा व खोबरे याची उधळण फुलाच्या माळा यांनी केलेली सजावट सर्व वातावरण प्रफुल्लित करत आहे.
