थेऊर (हवेलीनामा ऑनलाईन) गेली चार दिवस अष्टविनायकापैकी एक तीर्थक्षेत्र असलेल्या थेऊर श्री चिंतामणीस विविध आरास होत असून आज भारताचा अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून भारतीय सैन्यदल व त्यांची हिमालयाच्या कुशितील ताकद दाखवण्याचा देखावा साकारला आहे.
श्री चिंतामणीचे पुजारी आगलावे बंधू यांना आजची आरास करताना हिमालयाचा बर्फाळ प्रदेश दाखवताना भारतीय सैनिक हातात शस्त्र घेऊन आपल्या सिमेचा पहारा करत आहेत असे दर्शविले आहे.
दररोज वेगवेगळी संकल्पना साकारत असल्याने बाप्पा नविन रुपात अवतीर्ण होत आहेत. सगळीकडे गौरी गणपतीची लगबग तर आहेच तरीही अनेक भाविक दर्शनासाठी दररोज येत आहेत.
