पुणे (हवेलीनामा आॕनलाईन) शेती क्षेत्र कमी होऊ नये यासाठी गुंठेवारी कायदा करण्यात आला परंतु गेल्या कही वर्षापासून पुणे शहराच्या कक्षा रुंदावत आहेत परिणामी रहिवासी वसाहतींची मागणी देखील वाढली आहे शहरालगत असलेल्या हवेलीतील अनेक गावे मोठ्या लोकसंख्येची होत आहेत तर मध्यमवर्गीय नागरिक गुंठाभर जमीन खरेदी करून आपले स्वप्नातील घर बांधण्याचे स्वप्न पाहतो.परंतु गुंठेवारीला खिळून बसल्याने मध्यमवर्गीया बरोबरच या भागातील विकासक असलेली तरुण मंडळी देखील यात होरपळली आहेत त्यासाठी खरेदीखत चालू करण्यासाठी शासकीय पातळीवर लवकरच निर्णय घेण्यात यावा असी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मागणी केली आहे.
पुण्यातील एका कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ते बोलत होते यावेळी मुद्रांक शुल्क महानिरीक्षक श्रावण हर्डीकर उपस्थित होते.
ग्रामीण भागातील घरांच्या बांधकामासाठी अगोदर ग्रामपंचायतीस अधिकार होते परंतु नंतर हे अधिकार प्रांत अधिकारी व जिल्हाधिकाऱ्यांकडे वर्ग झाले अतिशय किचकट प्रक्रिया असल्याने नागरिकांनी याकडे दुर्लक्ष केले आज अनेक गृहप्रकल्प उभे आहेत त्याच्यावर अनधिकृत बांधकाम असा ठपका बसला यावर ग्रामपंचायत पातळीवर एखादे प्राधिकरण नेमून नागरिकांचे प्रश्न मार्गी लावण्याची मागणी केली.
